Call For Lasalgaon Bandh Agrowon
ॲग्रो विशेष

Call For Lasalgaon Bandh : लासलगावकरांच्या बहिष्कारानंतर प्रशासनाला खडबडून जाग

Boycott of Lok Sabha Elections : हंडाभर पाण्यासाठी वणवण  करणाऱ्या लासलगावकरांनी बहिष्कार व लासलगाव बंदची हाक दिल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यासह नाशिकच्या अनेक भागात सध्या धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. यामुळे धरणातील पाणी फक्त पिण्यासाठीच आरक्षित करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील गावं आणि वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशातच लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं आहे. यामुळे लासलगावकरांनी थेट लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्यासह लासलगाव बंदची हाक शनिवार (ता.११) दिली आहे. यामुळे सध्या नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारासह प्रशासनाची भंबेरी उडाली आहे. तसेच लासलगावला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर धरणात पाणी सोडण्याची निर्णय खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने घेतला आहे. 

लासलगावला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर धरणात पाणी नसल्याने पाणीटंचाई झाली होती. यामुळे गेल्या २०-२२ दिवसापासून महिलावर्गाला हंडाभर पाण्यासाठी राणोवणी पायपीट करावी लागत होती. मात्र लोकसभा निवडुकांत प्रशासन आणि नेते गुंतलेले असल्याने या प्रश्नाकडे कोणाचेच लक्ष नव्हते. यामुळे सतत विस्कळीत होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे लासलगावकरांसह व्यापाऱ्यांनी शनिवारी लासलगाव बंदची हाक दिली होती. 

तसेच नेत्यांना धडा शिवकण्यासाठी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. याप्राणे आज शहरातील सर्व व्यावसायिकांनी आपली शंभर टक्के दुकानं बंद ठेवत प्रशासनाचा निषेध केला आहे. यामुळे सुस्त प्रशासन खडबडून जागे झाले आहे. 

लासलगावकरांच्या निषेधानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयमध्ये गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांची बैठक पार पडली. यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी बैठक तोडगा काढू असे आश्वासन दिले.

मात्र कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. यावरून समस्त लासलगावकरांनी बंदची हाक देत आपला रोष व्यक्त केला. यानंतर आता वालदेवी मुकणे व दारणातील पाणी लासलगावला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर धरणात टाकले जाणार आहे.

कारण काय? 

दरम्यान अनेक वेळा तक्रारी करूनही पाणी पुरवठा वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे विस्कळीत होत होता. पण यावर कोणताही तोडगा निघत नव्हता. वारंवार होणाऱ्या विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. यानंतर लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराच्या इशाऱ्यासह लासलगाव बंदची हाक देण्यात आली होती. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : सप्टेंबरमधील पीकनुकसानीपोटी ६४ कोटी ६१ लाख रुपये निधी वितरणास मंजुरी

Crop Damage : नांदेडमध्ये सप्टेंबरमध्ये ३२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Gokul Dudh Dar: 'गोकुळ'कडून म्हैस, गायीच्या दूध खरेदी दरात १ रुपयाने वाढ, पशुखाद्य दरात ५० रुपयांची कपात

Farmer Protest: अतिवृष्टी, अपुरी मदत आणि रखडलेली कर्जमाफीसाठी किसान सभेचे २२ ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन

Mango-Cashew Crop Damage : बागायतदार आर्थिक संकटात

SCROLL FOR NEXT