Tur New Variety Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Selection Varieties : कमी पाण्यात येणाऱ्या सुधारित वाणांची निवड करा

IMD Department : यंदाचे पाऊसमान लक्षात घेता लवकर पक्व होणाऱ्या (कमी कालावधीच्या), कमी पाण्यात येणाऱ्या सुधारित वाणांची निवड करावी.

Team Agrowon

Dharashiva News : यंदाचे पाऊसमान लक्षात घेता लवकर पक्व होणाऱ्या (कमी कालावधीच्या), कमी पाण्यात येणाऱ्या सुधारित वाणांची निवड करावी. तसेच रुंद सरी वरंबा व आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राने केले आहे.

कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या वर्षी ‘एल निनो’चा प्रादुर्भाव असल्याने जून महिन्यामध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

जून महिन्यातील कमी पर्जन्यमान व तापमानवाढ लक्षात घेता खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन करावे. खरीप हंगाम जेमतेम १५ दिवसांवर आला. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन सुरू आहे. परंतु त्यासाठी हवामानाचा अंदाज घेणे फार महत्त्वाचे आहे.

जूनमध्ये जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसासोबतच तापमानाचा पारासुद्धा जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

हवामान विभागाने नुकताच मॉन्सूनचा दीर्घ कालीन (जून ते सप्टेंबर) अंदाज जाहीर केला. त्यानुसार या वर्षी वार्षिक सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा अंदाज आहे. त्यानुसार पेरणीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

मॉन्सूनचा दीर्घकालीन अंदाज लक्षात घेता पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. एल निनोच्या प्रभावाची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी कमी कालावधीची पिके, कमी पाण्यावर येणारी, पाण्याचा ताण सहन करणाऱ्या सुधारित वाणांची निवड करावी. यासोबतच बीज उगवणक्षमता व बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये.
डॉ. नकुल हरवाडीकर, कृषी-हवामान शास्त्रज्ञ, तुळजापूर
हवामान बदलामुळे शेती उत्पादनामध्ये अनिश्‍चितता निर्माण झाली. आकस्मिक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी जिल्हा कृषी-हवामान केंद्रामार्फत प्रसारित होणाऱ्या हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिकेचा अवलंब करून शेतीचे सुयोग्य नियोजन करावे.
प्रा. वर्षा मरवाळीकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT