Gondia News : अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमल्ली यांनी बुधवारी (दि.१८) सोलापुरात अंतिम श्वास घेतला. त्यांच्या अंतिम संस्कारानंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थी माधवझरी परिसरात विसावणार होत्या. मात्र याला वनविभागाची परवानगी न मिळाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पवनीधाबे येथील अरण्यपुत्र माधवराव पाटील डोंगरवार हे पद्मश्री चितमपल्ली यांचे गुरू. वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात पाण्याची चणचण भासू नये म्हणून माधवरावांनी माधवझरी हा परिसर निर्माण केला. सदर स्थळ माधवझरी हे नवेगावबांध (प्रादेशिक ) वनक्षेत्रात येत असून चुटिया कॅम्प परिसरात आहे. तिथेच माधवराव यांचा अंत्यविधी पार पडला होता.
त्या ठिकाणीच त्यांची समाधी बांधली आहे. माझ्याही अस्थी त्यांच्या शेजारी पुरण्यात याव्यात, अशी इच्छा अरण्यऋषींनी व्यक्त केली होती. त्यानुसार चितमपल्ली कुटुंबीयांनी त्यांच्या अस्थी धाबेपवनी येथे पाठविण्याचा निर्णय घेतला. २१ जून रोजी माधवझरी येथे येणार होत्या. मात्र, वनविभागाची परवानगी नसल्याने शनिवारी होणारा अस्थिकलश दफनविधी तूर्तास स्थगित झाला आहे.
याबाबत नवेगावबांधचे सहाय्यक उपवनसंरक्षक अविनाश मेश्राम तसेच वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा रामटेके, बोंडे वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी सुनील मडावी यांना विचारले असता आपल्याला या संदर्भात माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले
अरण्यऋषी यांच्या इच्छेनुसार आजोबांच्या समाधीशेजारी त्यांच्या अस्थी दफन करून समाधीस्थळ निर्माण करण्यात येणार होते. यासाठी तयारी करण्यात आली होती. माधवझरी परिसर वनक्षेत्रात येत असल्याने वनविभागाकडे परवानगी मागितली, पाठपुरावा केला. परवानगी मिळाल्यानंतर अरण्यऋषींचा अस्थिकलश त्यांचे गुरू डोंगरवार यांच्या समाधीनजीक दफन करणार आहे.- भीमसेन डोंगरवार, (माधवराव डोंगरवार यांचे नातू) पवनीधाबे.
माधवझरी हा परिसर संरक्षित वनक्षेत्रांतर्गत येत असल्याने या क्षेत्रात समाधीसाठी वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे.- सदाशिव अवगान, वनपरिक्षेत्राधिकारी,(प्रादेशिक) नवेगावबांध, गोंदिया
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.