Female Infanticide Agrowon
ॲग्रो विशेष

स्त्री भ्रूणहत्याबंदीसाठी सरसावली चिंचोशी

टीम ॲग्रोवन

पुणे ः कोल्हापूरच्या हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा (Ban Widow Tradition) बंद करण्याचा पहिला ठराव करीत राज्यभर सामाजिक मंथन घडवून आणले. त्यानंतर आता पुण्याच्या भोर तालुक्यातील चिंचोशी गावाने स्त्री भ्रूणहत्याबंदीच्या (Female Infanticide) विरोधात जागृतीची ज्योत पेटवली आहे. गावाने विशेष ग्रामसभा बोलावली आणि ‘चिंचोशीत यापुढे एकही स्त्री भ्रूणहत्या होऊ दिली जाणार नाही,’ असा ठराव एकमताने मंजूर केला आहे. सरपंच उज्ज्वला सुरेश गोकुळे यांच्या पुढाकारातून हे शक्य झाले आहे.

“गोकुळे या अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी राज्याचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे व माझ्याशी चर्चा केली. चिंचोशीने केलेला हा ठराव म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रातील आणखी एका सामाजिक चळवळीची सुरुवात आहे. राज्यातील इतर गावांनीही असे ठराव करावेत,” असे परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

राज्यात स्त्री-पुरुषांचे प्रमाण व्यस्त झाले आहे. दरहजारी पुरुषांच्या मागे तीस मुली कमी आढळत आहेत. स्त्री जन्मदर घटल्याने सामाजिक समतोल बिघडतो आहे. त्यामुळे लग्नाअभावी राहणारे तरुण ही एक वेगळी समस्या गावखेड्यांमध्ये वाढते आहे. या समस्येला स्त्री भ्रूणहत्या जबाबदार आहेत. त्यासाठी कायदे कडक असूनही जनमताचा पाठिंबा मिळत नसल्याने कायदा कागदावरच आहे, अशी खंत चिंचोशीतील गावकऱ्यांच्या मनात होती.

“या समस्येला सोडविण्यासाठी आपणच पुढाकार घ्यावा, अशी खूणगाठ मी बांधली. वटपौर्णिमेच्या निमित्ताने गावात विशेष ग्रामसभा घेतली. या वेळी सर्व महिला उपस्थित होत्या. त्यात आम्ही या विषयावर चर्चा घडवून आणली. या ग्रामसभेत अखिल भारतीय सरपंच परिषदेचे पाटील व मोरे यांनीही गावकऱ्यांचे मतपरिवर्तन केले,” असे सरपंच गोकुळे यांनी सांगितले.

उपसरपंच माया निकम, ग्रामसेविका सारिका गोरडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या सदस्यांनी या ठरावाला पाठिंबा दिला. त्यामुळे स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गावात एक आराखडा लागू करण्यात आला आहे.

चिंचोशी गावाने लागू केलेला आराखडा राज्यभर स्वीकारला जावा, यासाठी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आग्रह धरणार आहोत.
जयंत पाटील, अध्यक्ष, अखिल भारतीय सरपंच परिषद

गावाने लागू केलेला आराखडा
- स्त्री भ्रूणहत्या होणार नाही यासाठी गाव एकत्रित काळजी घेणार
- प्रत्येक गर्भवती महिलेची नोंद होण्यासाठी महिला पुढाकार घेणार
- या नोंदींवर आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर्स लक्ष ठेवणार
- गर्भवतींना नियमित दिली जाणार पौष्टिक आहार व औषधे
- खासगी दवाखान्यातील जन्मनोंदींवर लक्ष ठेवले जाणार
- मुलगा हवा, असा आग्रह धरणाऱ्या पालकांचे समुपदेशन होणार
- मुलगी किंवा मुलाला समान वागणूक मिळण्यासाठी जनजागृती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT