Chili Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Chili Crop Damage : नंदुरबारात मिरचीला नैसर्गिक आपत्तीचा फटका

Natural Calamity : यंदा मिरची पिकास नैसर्गिक किंवा अतिपावसाचा फटका बसला आहे. अपेक्षित उत्पादन आलेले नसून, शेतकरी आता ओल्या लाल मिरची उत्पादनाची तयारी करीत आहेत.

Team Agrowon

Nandurbar News : जिल्ह्यात यंदा मिरची पिकास नैसर्गिक किंवा अतिपावसाचा फटका बसला आहे. अपेक्षित उत्पादन आलेले नसून, शेतकरी आता ओल्या लाल मिरची उत्पादनाची तयारी करीत आहेत.

आतापर्यंत हिरव्या मिरचीची काढणी शेतकरी करून घेत होते. परंतु हिरव्या मिरचीचे दर अस्थिर किंवा कमी होत असल्याने हिरवी मिरची काढणी थांबवून त्यात ओल्या लाल मिरचीचे उत्पादन साध्य करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे.

जिल्ह्यात यंदा मिरची लागवडीत काहीशी वाढ झाली. लागवड जूनमध्ये पूर्ण झाली. पीकस्थिती ऑगस्टपर्यंत बरी होती. चांगल्या पावसाने उगवण जोमात झाली. तसेच वाढही दिसत होती. पण सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये पावसाने फटका बसला आहे.

मिरची लागवड मागील वेळेस सुमारे २१०० हेक्टरवर झाली होती. यंदा सुमारे अडीच हजार हेक्टरवर मिरची लागवड जिल्ह्यात झाली आहे. नंदुरबारातील कोठली, लहान शहादे, खोंडामळी, सुजालपूर, समशेरपूर, शहाद्यातील कुढावद, लोंढ्रा, धुरखेडा, म्हसावद, तळोद्यातील प्रतापपूर, रांझणी, बोरद आदी भागांत मिरची लागवड झाली आहे. लागवडीत काहीशी वाढ झाली.

चांगला पाऊस येईल, या अपेक्षेने लागवड जूनमध्ये सुरू झाली. लागवडीस १ जूनपासून सुरुवात झाली होती. ही लागवड १५ जूनपर्यंत सुरू होती. यंदा जूनमध्ये पाऊसमान बरे होते. यामुळे लागवड सुरूच राहिली. अनेक भागांत पाण्याची समस्या होती. परंतु शेतकऱ्यांनी काटेकोर पाणी व्यवस्थापन करून लागवड केली.

अनेकांचे पीक आता पाच महिन्यांचे झाले आहे. तर काही शेतकऱ्यांचे पीक ४० दिवसांचे आहे. पीकस्थिती बरी आहे. कारण पाऊस येत आहे. तसेच खते व पाण्याचे व्यवस्थापनही व्यवस्थित केले जात आहे. पण अतिपावसाने उत्पादन कमी आले आहे. हिरव्या मिरचीचे एकरी १०० ते १२० क्विंटल उत्पादन काहींना आले आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यंदा तळोदा व शहादा भागात मिरची लागवड अधिक झाली आहे. लांब व आखूड - तिखट प्रकारच्या वाणांना लागवडीसंबंधी शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. नंदुरबारात कोठली व लगत अधिकची मिरची लागवड झाली आहे.

मागील वेळेस कमी पाऊस होता. यंदा नंदुरबारातील लागवड कमी होईल, असा अंदाज होता. परंतु नंदुरबारातील लागवड स्थिर राहिली आहे. दुसरीकडे शहादा व तळोदा भागात अनेक शेतकऱ्यांनी नव्याने मिरची लागवड केली आहे.

निर्यातक्षम उत्पादन

अनेक शेतकऱ्यांनी खरेदीदारांशी करार करून लागवड केली आहे. निर्यातक्षम मिरची उत्पादन करून तिची पाठवणूक आखातात करण्यासंबंधी हे करार काही शेतकऱ्यांनी केले आहेत. गुजरातमधील खरेदीदारांशी हे करार झाले आहेत. प्रचलित दरांपेक्षा अधिकचे दर निर्यातीच्या मिरचीस मिळतात. यामुळे हे करार अनेकांनी केले आहे. यात दर्जेदार निविष्ठांचा पुरवठा व तांत्रिक मार्गदर्शनही शेतकऱ्यांना केले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nana Patole : नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा? ; राहुल गांधी यांची घेणार भेट

Indian Politics : इंडिया आघाडीसह मित्रपक्षही महायुतीच्या विजयाने बेचैन

Import Policy : आयातीचे घातक धोरण

Parliament Winter Session 2024 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात, अदानी, वक्फ विधेयकामुळे विरोधक आक्रमक होणार?

Onion Crop : आळेफाटा परिसरात कांदा पीक फुलोऱ्यात

SCROLL FOR NEXT