Green Chili Price Drop : हिरवी मिरचीचे दर घसरले ११ हजारांवरून ११०० रुपयांवर

Green Chili Price Fluctuation : आता मिरचीचे दर ११०० ते १५०० रुपये क्‍विंटलवर आल्याने मिरची उत्पादकांच्या खर्चाची देखील भरपाई होत नसल्याचे चित्र आहे.
Chilli Market
Chilli MarketAgrowon
Published on
Updated on

Amravati News : हंगामाच्या सुरुवातीला हिरव्या मिरचीला साडेसात ते अकरा हजार रुपये प्रति क्‍विंटल रुपयांचा दर होता. त्यानंतर आता मिरचीचे दर ११०० ते १५०० रुपये क्‍विंटलवर आल्याने मिरची उत्पादकांच्या खर्चाची देखील भरपाई होत नसल्याचे चित्र आहे.

अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी या दोन तालुक्‍यांत सुमारे ७० हजार हेक्‍टरवर संत्रा लागवड क्षेत्र आहे. त्यामुळेच या भागाला विदर्भाचा कॅलिफोर्निया असे म्हटले जाते. याच भागात गेल्या काही वर्षांत नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची हिरव्या मिरचीच्या लागवडीला पसंती मिळाली आहे. त्यामुळेच हिरव्या मिरचीखालील लागवड क्षेत्रातही वाढ नोंदविण्यात आली आहे.

Chilli Market
Chili Value Chain : ‘कृषक स्वराज्य’ने उभारली मिरचीची मूल्यसाखळी

हिरव्या मिरचीच्या विक्रीसाठी या भागात राजुरा बाजार येथे रात्री भरणाऱ्या बाजाराचा पर्याय देखील उपलब्ध आहे. राजुरा बाजार येथे खरेदी करण्यात आलेल्या हिरव्या मिरचीचा पुरवठा देशांतर्गत विविध बाजारात होतो. त्यासोबतच लगतच्या बांगलादेशला हिरव्या मिरचीची निर्यात होते. त्यामुळे रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल या बाजारात होते.

गेल्या आठवड्यात हिरव्या मिरचीचे दर ११ हजार रुपये क्‍विंटलवर गेले होते. हिरव्या मिरचीच्या माध्यमातून चांगला परतावा मिळत असल्याने शेतकरी देखील समाधानी होते. दिवाळीच्या कालावधीत हिरव्या मिरचीच्या दरात काहीशी घसरण होत हे दर ७००० ते ७५०० रुपयांवर पोहोचले.

Chilli Market
Chili Processing Center : मराठवाड्यात पहिल्या मिरची प्रक्रिया केंद्राचे भूमिपूजन

त्यानंतर आता मात्र अवघ्या १२०० ते १५०० रुपये किलोने हिरव्या मिरचीचे व्यवहार होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यातून उत्पादकता खर्चाची भरपाई देखील होत नसल्याचे शेतकरी सांगतात. हिरवी मिरची परिपक्व होताच तिची तोडणी करावी लागते. जास्त दिवस झाडावर राहिल्यास ती त्याच ठिकाणी लाल होण्याची भीती राहते. मात्र गेल्या चार दिवसांपासून दर दबावात आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

मिरची पिकाचा कालावधी अधिक आहे. त्यामुळे पिकाच्या व्यवस्थापन तसेच कीड-रोग नियंत्रणावर मोठा खर्च होतो. त्यासोबतच तोडणीकामी मजुरांची गरज देखील तुलनेत अधिक भासते. एक मजूर दिवसभरात सरासरी २५ ते २८ किलो मिरची तोडतो. त्यासाठी मजूरांना ४०० रुपये द्यावे लागतात.

या दराचा सरासरी विचार करता तोडणीकामी असलेल्या मजुरांना प्रति किलो १२ ते १४ रुपये मिळतात. याउलट मिरची विक्रीपोटी आता बाजारातच १० ते १५ रुपयांचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे मिरचीला किमान ४० रुपयांचा दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

राजुरा बाजारात मिरची खरेदीसाठी दिल्ली, पश्‍चिम बंगाल भागातील व्यापारी दाखल होतात. सध्या ते माघारी गेल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मागणी अभावी दरात घसरण झाल्याचा दावा व्यापारीस्तरावरून केला जात आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा ४० रुपये प्रति किलोचा दर मिळावा, अशी आहे. परंतु बाजारातील चढ-उतार गृहीत धरावेच लागतात.
योगेश नारायण भोंडे, मिरची उत्पादक, राजुरा बाजार, अमरावती
एकाच बाजारावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी इतर बाजारपेठेचा पर्याय हाताशी ठेवावा. त्यामुळे स्पर्धा वाढत चांगले दर मिळू शकतात. राजुरा बाजारातून हिरवी मिरची बांगलादेशला निर्यात होते. परंतु तेथील सातत्याने बदलत्या परिस्थितीचा व्यापारावर अनेकदा परिणाम होतो.
मुन्ना चांडक, व्यापारी, राजुरा बाजार, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com