MGNREGA Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Development : चिखलदरा तालुक्‍यात सर्वाधिक कामे

MGNREGA Work : निवडणूक त्याबरोबरत सोयाबीन हंगाम संपुष्टात आला. त्यामुळे आता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेवरील मजूर परतण्यास सुरुवात झाली आहे. सद्यःस्थितीत ६७३ ग्रामपंचायतींमध्ये ७४,३९७ मजुरांच्या हातांना गावातच काम मिळाले आहे.

Team Agrowon

Amravati News : निवडणूक त्याबरोबरत सोयाबीन हंगाम संपुष्टात आला. त्यामुळे आता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेवरील मजूर परतण्यास सुरुवात झाली आहे. सद्यःस्थितीत ६७३ ग्रामपंचायतींमध्ये ७४,३९७ मजुरांच्या हातांना गावातच काम मिळाले आहे.

गावातच काम आणि गावातच दाम यानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यातील १४ ही तालुक्‍यांत ४,७५३ कामे सुरू आहेत. दरदिवशी या मजुरांना २९७ रुपयांची मजुरी दिले जाते. विशेष म्हणजे मेळघाटात सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम केलेल्या व सध्या नंदुरबार जिल्हाधिकारी पदावर असलेल्या मिताली सेठी यांनी तब्बल २८ अधिकारी, कर्मचारी यांचे पथक या कामांची पाहणी करण्यासाठी व त्यानुसार जिल्ह्यातील आराखडे तयार करण्यासाठी नुकतेच अभ्यास दौऱ्यावर पाठविले होते.

मजुरांचे स्थलांतर रोखण्यात या योजनेचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच ही योजना महत्त्वाची ठरते. योजनेची संपूर्ण कार्यप्रणाली संगणकीकृत असून हजेरीदेखील ऑनलाइन होते. या कार्यपद्धतीमुळे योजनेतील बोगसगिरीला चाप लागण्यास मदत झाली आहे. योजनेच्या कामावरील मजुरीचे पैसे थेट बॅंक खात्यात जमा होतात. या सर्व जॉबकार्डधारकांचे आधार लिंक करण्यात आले आहेत.

शिवाय या योजनेमध्ये १०० दिवसांचा निधी केंद्र शासन देते तर त्यावरील कामासाठीच्या निधीची पूर्तता राज्य शासनस्तरावर केली जाते. आता कामांवर मजुरांची संख्या वाढत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) ज्ञानेश घ्यार यांनी दिली. या योजनेसाठी सर्वाधिक जॉबकार्डधारक मेळघाटात आहेत.

यामध्ये चिखलदरा तालुक्‍यात ३८,४६१, धारणीत १७,४६९ जॉबकार्डधारक आहेत. याशिवाय अचलपूर ३१०९, अमरावती १२५४, अंजनगावसूर्जी ७४७, भातकुली ४१७, चांदूररेल्वे ७४९, चांदूरबाजार २६४४, दर्यापूर १०७५, धामणगाव ८६१, मोर्शी ४६०७, नांदगाव खंडेशवर ६६८, तिवसा १२२० व वरुड तालुक्‍यात १०९६ जॉबकार्डधारक आहेत.

चिखलदरा तालुक्‍यात सर्वाधिक कामे

जिल्ह्यात सद्यःस्थितीत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची ४७५३ कामे सुरू आहेत. यामध्ये सर्वाधिक १,०९५ चिखलदरा तालुक्‍यात सुरू आहेत. अचलपूर ८८८, अमरावती १९४, अंजनगावसूर्जी १४७, भातकुली ९३, चांदूररेल्वे १२९, चांदूरबाजार ४७७, दर्यापूर २७०, धामणगाव १४९, धारणी ३१८, मोर्शी ४६४, नांदगाव खंडेश्‍वर १५९८, तिवसा १८२, वरुड तालुक्‍यात १८८ कामे सुरू आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Update : बार्शी तालुक्यात अतिवृष्टीने शेतीपिकांचं नुकसान; खासदार ओम राजेनिंबाळकरांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Agriculture Input GST : शेती अवजारांवरील जीएसटी रद्द होणार?

Crop Damage Compensation : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ४० कोटींची भरपाई

Voter Fraud: चंद्रपूरमध्ये एकच घरात ११९ मतदार; मतदार यादीतील आणखी एक गैरप्रकार उघड

Ladki Bahin Yojana: साताऱ्यात ८४ हजार अपात्र लाडक्या बहीणी; १५१ कोटींची वसुली होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT