Eknath Shinde Agrowon
ॲग्रो विशेष

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली मॉन्सूनपूर्व आढावा बैठक; आपत्ती व्यवस्थापनावर केली चर्चा

Pre-Monsoon Review Meeting : मॉन्सून हंगाम अवघा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी मॉन्सूनमधील व्यवस्थापनाबद्दल आढावा बैठक घेऊन प्रशासनाला सुचना केल्या.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. २८) मंत्रालयात मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. राज्यात झिरो कॅज्यूलिटी मिशन राबवण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी केला. राज्यातील दुष्काळी स्थितीसह अवकाळी आणि वळवामुळे झालेले नुकसान आणि मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत घेतला. याबाबतची माहिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्यासह विभागीय आयुक्त उपस्थित होते. तर प्रत्येक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दृकश्राव्य माध्यमातून सहभागी झाले होते. 

यावेळी शिंदे म्हणाले, "मॉन्सून काळात भूस्खलन, पूर अशा संभाव्य आपत्तीच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने आराखडा तयार केला आहे. तसेच कर्नाटक आणि इतर शेजारी राज्यांशी समन्वय ठेवण्यासाठी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. तर पूर स्थिती निर्माण झाल्यास पुरेसा अन्नधान्याचा साठा करण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. तसेच यंदा पाऊल चांगाला होणार असून हवामान खात्याशी समन्वय ठेवण्यात यावा. धोकादायक इमारती, साथीचे आजारांवर औषध-उपचाराबाबत चर्चा करण्यात आल्याचंही शिंदे म्हणाले. 

राज्यात कोणतीच समस्या येऊ नये. यासाठी योजना आखण्यात येणार आहे. त्याबद्दल बैठकीत चर्चा झाल्याचे शिंदे म्हणाले. ठाणे महापालिकेप्रमाणेच टीडीआरएफ तयार केला असून एक आपत्ती व्यवस्थापन दल तयार केले आहे. याप्रमाणे इतर महापालिकांनी दल तयार केल्यास ते एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक दाखल होईपर्यंत मदत कार्य हाताळेल. परिणामी राज्यातील एसडीआरएफच्या पथकांची संख्या वाढवण्यासह ग्रामीण भागातील पट्टीच्या पोहणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन तयार केले जाऊ शकते का, यावर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

दरम्यान, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, चाराटंचाई आणि मॉन्सूनपूर्व परिस्थितीचा आढावा गेल्या आठवड्यात गुरुवारी (ता.२३) छत्रपती संभाजीनगरमध्ये घेण्यात आला होता. दुष्काळग्रस्त भागात आढावा घेऊन केवळ सूचना केल्यामुळे मुख्यमंत्र्यांवर सर्वस्तरातून टीका झाली होती. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Coconut Conclave: नारळ - काजूची लागवड वाढवा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, 'ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे गोव्यात प्रकाशन

Gokul Dudh Sangh: डिबेंचर रक्कम कपातीचा मुद्दा, कोल्हापुरातील वातावरण तापलं, 'गोकुळ'समोर दूध उत्पादकांचे उपोषण

Crop Damage Compensation : ‘दौरे बंद करून वाढीव मदतीसाठी प्रयत्न करा’

Rabi Season : परभणी जिल्ह्यात ४ हजार ४४५ क्विंटल रब्बी बियाणे वाटपाचा लक्ष्यांक

Nanded Rainfall : सरासरी १३९.०६ टक्के पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT