CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तहानलेल्या मराठवाड्याचा दौरा फक्त सूचनांपूरता

Drought Situation in Marathwada : वाढत्या पाणीटंचाईमुळे राज्यातील जणता होरपळत असताना राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारात मग्न होते.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात वाढती उष्णता आणि भीषण पाणी टंचाईमुळे जणता होरपळत असून सर्वाधिक फटका हा मराठवाड्याला बसत आहे. मराठवाड्याला सध्या भीषण पाणीटंचाई आणि चारा टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावरून मुख्यमंत्री शिंदे गुरूवारी (ता. २३) मराठवाड्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीवर आढावा बैठक घेतली. यावेळी शिंदे यांनी कोणत्याही ठोस घोषणा न करता फक्त सूचनांचा पाऊस पाडला. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसह मराठवाड्यातील जनतेची घोर निराशा झाली आहे.

राज्यात वाढती उष्णता आणि भीषण पाणी टंचाईमुळे जणता हैराण झाली असून शेतकरी उभे पीक करपत असल्याने चिंतातूर झाला आहे. तर शेतीसह पिण्यासाठी पाणी मिळावे अशी मागणी राज्यातील जनतेकडून केली जात असताना राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर नेते हे लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात व्यस्त होते. पण आता राज्यातील पाचव्या टप्यातील मतदान पार पडले असून नेत्यांसह पुढाऱ्यांना सर्वसामान्य जनता दिसू लागली आहे.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde : तहानलेल्या मराठवाड्याची मुख्यमंत्र्यांना आता आठवण? शिंदे संभाजीनगरच्या दौऱ्यावर

मराठवाड्यासह राज्यातील भीषण पाणी आणि चारा टंचाईवर तोडगा काढण्यासाठी शिंदे यांनी आज छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. मात्र या बैठकीकडे अनेक पालकमंत्र्यांनी टांग मारली आहे. यावेळी शिंदे म्हणाले, आज येथे पिण्याच्या पाण्यासह शेतीचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नावर बैठक घेण्यात आली. यावेळी अवकाळीने झालेल्या नुकसानीवर देखील चर्चा झाली. तसेच मान्सूनपूर्व कामाचा आढावा घेण्यात आला.

तसेच सध्या मराठवाड्यात १८३७ टँकर सुरू असून येथील १२४९ गावे आणि ५१२ वाड्यावर पाणीपुरवठा केला जात आहे. सध्याची स्थिती पाहता टँकर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे टँकरची गरज भासल्यास ते देण्यात यावेत अशा सूचना ग्रामसेवक आणि तलाठ्यांना देखील देण्यात आल्या आहेत असे शिंदे म्हणाले.

शिंदे म्हणाले, चाऱ्याच्या बाबातीत देखील अशाच सूचना करण्यात आल्या आहेत. डीपीडीसीमधून चारा उगवण्यासाठी अनुदान देण्यात आले होते. याचा आता फायदा झाला असून जिल्ह्या जिल्ह्याला पुरेल येवढा चारा उपलब्ध आहे. पण गरज भासली तर अधिकचा चारा उपलब्ध करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीत कपात तर यंत्रमाग धारकांसाठी वीज सवलत, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

तर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना एक जाहिरात आणि त्यावर एक नंबर देण्याच्या सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे ती काढण्यात आली आहे. यावरील नंबरवर टँकरची किंवा चाऱ्याची मागणी केल्यास पुढील तीन दिवसात त्याची पूर्तता केली जाईल अशा ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

याचबरोबर स्वच्छ पाणी प्रत्येकाला देण्यासाठी पाण्याचा दर्जा आणि गुणवत्ता तपासण्या करा, अशा सूचना केल्याचे शिंदे म्हणाले. तसेच या आढावा बैठकीत जुन्या बिलांवरूनही शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत. यावरून शिंदे म्हणाले की, थकीत बिले असतील तर ती नंतर पाहिली जातील पण थकीत बिलामुळे पाणी पुरवठा योजना बंद करू नये.

...तर तुरुंगात टाकू

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बोगस बियाणे आणि खतावरून थेट इशारा देताना बोगस बियाणे आणि खते सापडल्यास थेट तुरुंगात टाकू असे म्हटले आहे. तसेच बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये अशी सूचना करताना अवकाळीचे पंचनामे लवकर करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना केल्याचे शिंदे म्हणाले.

भूजल पातळी अशी वाढवणार

सध्या राज्यातील भूजल पातळीत घट झाली असून पुर्नभरण संदर्भात जलयुक्त शिवार, जलसंधारण विभाग आणि जलसंपदा विभाग यांना देखील सूचना दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तर भूजल पातळी वाढवण्यासाठी नाम फाऊंडेशन, आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण, अमिर खानचे पाणी फाऊंडेशनसह अनेक एनजीओंची मदत घेतली जाईल. या सर्वांच्या मदतीने गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवारासाठी प्रयत्न करण्यात येईल असेही शिंदे म्हणाले. याचबरोबर शिंदे यांनी यावेळी पाण्याचे योग्य नियोजन व्यवस्थित होण्यासह पिण्याच्या पाण्याचा वापर हा बांधकामासाठी करू नये अशा सूचना दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com