CM Eknath Shinde On Nano Urea and Nano DAP Agrowon
ॲग्रो विशेष

Nano Urea and Nano DAP fertilizers : वित्त विभागाच्या अभिप्रायानंतरच नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांच्या खरेदीचा प्रस्ताव ; मुख्यमंत्री शिंदे यांचे स्पष्टीकरण

CM Eknath Shinde News : नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांच्या खरेदीचा प्रस्तावावर मंत्रीमंडळाच्या बैठकीत फुली मारण्यात आली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वित्त विभागाचा अभिप्राय आल्यानंतरच यावर निर्णय घेऊ असे म्हटले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : प्रती हेक्टरला नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीचे वाटप शेतकर्‍यांना केल्याने मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादनात वाढ होईल, असा दावा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केला होता. तर त्यांनी सरकारकडे नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांच्या खरेदीचा प्रस्ताव मंगळवारी (ता.१३) सादर केला होता. या प्रस्तावाला सरकारने नाकारले असून त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत फुली मारण्यात आली आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वित्त विभागाचा अभिप्राय आल्यानंतरच नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांच्या खरेदीचा प्रस्तावाचा विचार करू असे म्हटले आहे. यावरून आता विविध चर्चांना उधान आले आहे.

कृषीमंत्री मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत १ हजार ४०० कोटी रुपयांचा नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांच्या खरेदीचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र त्यावर वित्त विभागाचा अभिप्राय नसल्याचे तो मंजूर करण्यात आला नाही. तर वित्त विभागाचा अभिप्राय आल्यानंतरच नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांच्या खरेदीचा प्रस्तावाचा विचार करू असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले.

यावरून कृषीमंत्री मुंडे यांनी प्रस्ताव मंत्रिमंडळाने नाकारल्यानंतर पुन्हा एकदा मंजूरीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच मुंडे यांनी, हा प्रस्ताव शेतकरी हिताचा असून याबाबत चुकीची माहिती दिली जात असल्याचा दावा बैठकीत केला. तसेच प्रस्तावामुळे आपला वैयक्तिक कोणताच लाभ होणार नसून शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचेही मुंडे यांनी बैठकीत सांगितले. मात्र यानंतरही या प्रस्तावावर अद्याप वित्त व्भागाने कोणत्याही प्रकारचे मत नोंदवलेले नसल्याने नंतर यावर चर्चा करू असे स्पष्ट मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

कृषी विभागाच्या प्रधान सचिवांची बदली

मंत्रिमंडळ बैठकीत नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांच्या खरेदीचा प्रस्ताव पुन्हा कृषी विभागाकडून सादर केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान कृषी विभागाच्या प्रधान सचिव (एसीएस) आयएएस व्ही. राधा आणि कृषीमंत्री मुंडे यांच्यातील मतभेद समोर आले आहेत. तर मंत्रिमंडळ बैठकी आधीच त्यांनी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. यामागे या प्रस्तावाविरोधात मत मांडू शकतात अशी शक्यतेमुळेच राधा यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.

यावरून काँग्रेसचे नेते तथा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील व्ही. राधा यांच्या तडकाफडकी बदलीवरून सरकारवर टीका केली आहे. वडेट्टीवार यांनी, व्ही. राधा भ्रष्टाचारात सहकार्य करत नव्हत्या. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली असा आरोप केला आहे. यावरून कृषीमंत्री मुंडे यांनी राधा यांच्या बदलीत आपला हात नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. पण राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर अशाप्रकारे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या होत असल्याने राजकारण तापते आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season 2024 : दामाजी, विठ्ठलराव शिंदे कारखान्यांचा वाहतूक खर्च कमी

Latur Voting Percentage : वाढलेल्या मताच्या टक्क्याचा कोणाला बसणार?

Nashik Assembly Voting : नाशिक जिल्ह्यात सरासरी ६७.९७ टक्के मतदान

Agriculture Irrigation : सिंचन योजनेतून शेतीसाठी २१ टीएमसी पाणी

GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी

SCROLL FOR NEXT