Eknath Shinde | Ajit Pawar agrowon
ॲग्रो विशेष

Shinde-Pawar Kolhapur Tour : मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्‍यमंत्री पवार कोल्हापूर दौऱ्यावर, राजकीय हालचालींना वेग

KDCC Bank Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्याचे सहकाराचे केंद्र बिंदू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन इमारत उद्‍घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

sandeep Shirguppe

Kolhapur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन इमारत उद्‍घाटनाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते बुधवारी (ता.०९) सायंकाळी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते राधानगरी-भुदरगड येथील विकासकामांचे उद्‍घाटन होईल. त्यानंतर ते दसरा चौकातील महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्‌घाटन आणि प्रारंभ करतील. दसरा चौकातच शिवसेनेचा मेळावा होणार आहे.

माजी खासदार संजय मंडलिक यांंनी कागल विधानसभेसाठी आपल्या पुत्राचे नाव घोषीत करत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात लढण्याचे आव्हान दिले. तर कोल्हापुरातील उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

उपमुख्यमंत्र्यांचा दौरा

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुपारी सव्वाचारला कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. तेथून ते कागल विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे उद्‍घाटन करतील. त्यानंतर ते, सायंकाळी साडेसातच्या सुमारास जिल्हा बँक नूतन इमारत उद्‍घाटन सोहळ्यास उपस्थित राहतील. तेथून ते शेंडापार्क येथील सर्वोपचार रुग्णालयाच्या भूमिपूजन समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर त्यांचा वेळ राखीव आहे. त्यानंतर ते रात्री कोल्हापूर विमानतळावरून मुंबईकडे रवाना होतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT