Haryana Election Result : हरियाणात भाजप, तर ‘एनसी’ जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेच्या तयारीत

Jammu Kashmir Election Result 2024: भारतीय जनता पक्ष हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स (एनसी)-काँग्रेस युती सरकार स्थापन करण्याच्या मार्गावर आहे.
Haryana won BJP
Haryana won BJPAgrowon
Published on
Updated on

New Delhi News : भारतीय जनता पक्ष हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स (एनसी)-काँग्रेस युती सरकार स्थापन करण्याच्या मार्गावर आहे. मंगळवारी (ता. ८) विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले.

निवडणूक आयोगाच्या दिलेल्या निकालानुसार, हरियाणा विधानसभेच्या ९० जागांवर झालेल्या निवडणुकीचा मंगळवारी (ता. ८) निकाल लागला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत, हरियाणामध्ये भाजपने ४९ जागा जिंकल्या, तर काँग्रेस आघाडीने ३६ जागा जिंकल्या. इंडियन नॅशनल लोकदल पक्षाने दोन जागांवर आघाडी मिळवली. तर अपक्षने ३ जागा मिळवल्या.

Haryana won BJP
Haryana Election 2024 : हरियाणात भाजप तर जम्मू अन् काश्मीरमध्ये जेकेएनसी, कॉँग्रेस आघाडीवर

जम्मू आणि काश्मीरमध्ये, नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला ४२ जागा मिळाल्या. तर, भाजप आघाडीला २९ जागा मिळाल्या. काँग्रेसला ६ जागांवर विजय मिळवता आला. तर पीडीपीला ३, जेके पीपल्स कॉन्फरन्स १, आम आदमी पक्षाला १ आणि अपक्ष ७ जागा राखता आल्या. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला एका जागेवर आघाडी मिळाली.

Haryana won BJP
Co-operative Societies Election : विधानसभा निवडणुकांमुळे सहकार संस्थांच्या निवडणुका पुन्हा ढकलल्या पुढे

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा, ज्यांना काँग्रेसच्या प्रचाराचा चेहरा म्हणून पाहिले जाते, ते गढी सांपला-किलोई येथून ७१ हजारांहून अधिक मते घेऊन विजयी झाले. जुलानामधून माजी कुस्तीपटू विनेश फोगट विजयी ठरल्या. काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांचा मुलगा आदित्य याने कैथलमधून पहिली निवडणूक जिंकली.

जम्मू-काश्‍मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जम्मू-काश्मीरमध्ये ९० जागांसाठी मतदान झाले. जम्मू-काश्मीरमधून ओमर अब्दुल्ला हे गांदरबल आणि बडगाम मतदारसंघातून निवडून आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com