Ashadhi Wari 2024 agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2024 :'बळीराजा सुखी राहुदे', मुख्यमंत्र्यांची विठ्ठलकडे मागणी; नाशिकचे शेतकरी दाम्पत्य पुजेचे मानकरी

Ashadhi Akadashi : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली.

sandeep Shirguppe

Ashadhi Ekadashi Pandharpur Mahapuja : माझा शेतकरी सुखी -समाधानी राहूदे, राज्यात भरपूर पाऊस होऊदे, असं साकडं मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाकडे घातलं. आज (ता. १७) आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे असं संपूर्ण कुटुंब उपस्थित आहे.

विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि मानाचे वारकरी अहिरे दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. इथं रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून पूजा करण्यात आली. दरम्यान, प्रसाद म्हणून श्रीफळ, तुळशी हार आणि पुष्पहार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला.

प्रत्येक वर्षी विठ्ठलाच्या पुजेचा मान एका वारकरी दाम्पत्याला दिला जातो. यंदा विठ्ठलाच्या पुजेचा मान नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्य ठरले. सटाणा तालुक्यातील अंबासन गावातील बाळू शंकर अहिरे (वय ५५) आणि सौ. आशाबाई बाळू अहिरे (वय ५० यांना संधी मिळाली आहे. अहिरे दाम्पत्य मागील १६ वर्षांपासून पंढरीची वारी करत आहेत.

मध्यरात्रीपासूनच चंद्रभागेच्या स्नानासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली आहे. पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व लोक कलावंतांना आणि मान्यवरांना यावेळी गौरविण्यात आले. यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कामगार मंत्री सुरेश खाडे, मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यास अनेक आमदार खासदार उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT