Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election Results 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील २८८ मतदारसंघातील निकाल हाती येत असून पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार राज्यात स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे यांनी, लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळेच आमचा विजय होत, असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत असून अनेक ठिकाणी १० हून अधिक मतमोजणीच्या फेऱ्या पार पडल्या आहेत. ज्यात भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीन पक्षांना चांगले यश मिळाले आहे. तर जवळजवळ २१७ पेक्षा अधिक ठिकाणी आघाडी मिळाली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे.

दुपारपर्यंत झालेल्या फेऱ्यांमध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारली असून बहुमतापेक्षाही अधिकचा जागा गाठल्या आहेत. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना, आता महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, असे म्हटले आहे.

शिंदे यांनी राज्यातील मतदारांनी महायुतीवर ज्या प्रकारे विश्वास दाखवला त्याबद्दल महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच आम्हाला मिळालेले स्पष्ट बहुमत हे लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे मिळाले आहे. आमचा विजय होत असल्याचे म्हटले आहे.

याचबरोबर शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना, संपूर्ण निकाल लागल्यानंतर आम्ही तीनही पक्ष एकत्र बसून पुढचा निर्णय घेऊ असे म्हटले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावरून ट्वीटरवर पोस्ट केली आहे. फडणवीस यांनी, एक है तो ‘सेफ’ है ! मोदी है तो मुमकिन हैं ! असे म्हटले आहे.

तर विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून खासदार संजय राऊत यांनी संशय व्यक्त करताना जोरदार टीका केली. राऊत यांनी निकालात गडबड झाल्याचा आरोप केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका; गावांमध्ये शिरले पाणी, बचावकार्य सुरु

Konkan crop advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

SCROLL FOR NEXT