Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory Election : छत्रपती कारखान्याची निवडणूक जूननंतर

Shree Chhatrapati Cooperative Sugar Factory : भवानीनगर (ता. इंदापूर ) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जूननंतर होणार आहे.

Team Agrowon

Walchandnagar News : भवानीनगर (ता. इंदापूर ) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जूननंतर होणार आहे. त्यामुळे कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाला चार वर्षांपेक्षा अधिक मुदतवाढीचा बोनस मिळणार आहे.

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक एप्रिल २०१५ मध्ये झाली होती. संचालक मंडळाचा कार्यकाळ ११ मे २०२० पर्यंत होता. २०२० मध्ये छत्रपती कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होणे अपेक्षित होते.

आतापर्यंत निवडणुकीसाठी तीन वेळा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक (Prithviraj Jachak) यांच्यासह अनेक सभासदांनी कारखान्याला सलग ऊस पुरवठा न करणारे सभासद, थकबाकीदार सभासद यांच्यासह अक्रियाशील सभासदांना मतदानाचा अधिकार देऊ नये, यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली.

त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली. कोरोना काळामध्ये राज्य सरकारने निवडणूक पुढे ढकलली. सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.

राज्य सरकारने बुधवारी ( ता.२८ ) आदेश काढून सहकारी संस्थांच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर ३१ मे पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे छत्रपती कारखान्याची निवडणूक मे नंतरच होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT