Minister Nitin Gadkari And Devendra fadnvis Agrowon
ॲग्रो विशेष

Minister Nitin Gadkari : ...तर पुतळ्यांचा उपयोग काय?

Chhatrapati Shivaji Maharaj statue : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.

Team Agrowon

Nagpur News : छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा, पिता आणि शासक होते. पुतळा उभा केल्यानंतर त्यांचे विचार आणि कार्याच्या अनुरूप आपले चरित्र, चारित्र्य आणि व्यवहार हवा. तो तसा नसेल तर नुसते पुतळे उभारून काही उपयोग होणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (ता. १८) करण्यात आले. यानिमित्ताने वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

श्री. गडकरी पुढे म्हणाले, महापुरुषांचा इतिहास आणि चरित्र नव्या पिढीसमोर नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन नेले पाहिजे. विद्यापीठात ऑडिटोरिय आणि कन्हेंशन सेंटर बांधायचे ठरले आहे. यातील ऑडिटोरियममध्ये लाइट ॲण्ड साऊण्ड शो करता येईल का? याचा प्रयत्न करू. प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांची तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट काढायची इच्छा अपूर्ण राहिली, अशी खंतही गडकरींनी यावेळी व्यक्‍त केली.

यावेळी गडकरी यांनी पुतळा उभारणीसाठी पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली. तंजावर येथील प्रिन्स शिवाजी राजे भोसले, स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीमंत राजे मुधोजी भोसले, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, आमदार अनिल देशमुख, मोहन मते, अभिजित वंजारी, प्रवीण दटके, माजी आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, बबनराव तायवाडे यांची यावेळी उपस्थिती होती.

...असा असेल पुतळा

नागपूर विद्यापीठाच्या परिसरात उभा राहणार सिंहासनारूढ पुतळा जगात सर्वांत भव्य असेल असा दावा करण्यात आला आहे. पुतळ्याच्या चबुतऱ्याची लांबी २० फूट, रुंदी १५ फूट, उंची ९ फूट असेल तर यावरील पुतळा ३२ फूट उंचीचा राहणार आहे.

त्यावरील छत्र ७ फूट उंचीचे असेल. संपूर्ण ब्राँझ धातूने बांधला जाणारा हा पुतळा १० हजार किलोग्रॅमचा असणार आहे. प्रसिद्ध मूर्तिकार सोनल कोहाड हे शिल्प साकारतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT