Sambhajiraje Chhatrapati Agrowon
ॲग्रो विशेष

Sambhaji Raje : शेतकरी संकटात असताना कृषीमंत्री भाषणे ठोकत फिरतायत ; संभाजीराजेंची टीका

Sambhaji Raje Chhatrapati on Munde : संपूर्ण राज्यावर दुष्काळाचे सावट असताना कृषिमंत्री उत्तर सभांतून भाषणे ठोकत फिरताय, अशा शब्दात स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे यांनी टीका केली.

Swapnil Shinde

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati : राज्यात दुष्काळाचे मोठे संकट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, परंतु राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे वेगवेगळ्या जिल्ह्यात उत्तर सभा घेऊन भाषणे करण्यात धन्यता मानतात, अशी नाराजी माजी खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली.

स्वराज्य पक्षाच्यावतीने माजी खासदार संभाजीराजे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लासलगावमध्ये शेतकऱ्यांच्या संघर्ष सभेत राज्य सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा समाज उभा आहे. गरीब मराठा समाजाला आरक्षणापासून दूर का ठेवलं, या सरकारने दीड वर्षात भूमिका घेतली नाही, ही बाब दुर्दैवी आहे. मागच्या सरकारला आणि सध्या अस्तित्वात असलेल्या सरकारलाही आम्ही जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संभाजीराजे म्हणाले, पावसाने ओढ दिल्याने हंगामातील पिके धोक्यात आहेत. त्याचबरोबर कांदा, टोमॅटो आदी शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. राज्यात बीड जिल्ह्यात आत्महत्यांचे सर्वाधिक प्रमाण आहे. मात्र, त्याच जिल्ह्यातील कृषिमंत्री धनंजय मुंडे उत्तर सभा घेण्यात व्यस्त आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Harvesting: आंबा फळांची काढणी करताना...

Sugarcane Harvesting: मजूर, यंत्राद्वारे ऊस तोडणीचा अभ्यास

End Of Naxalism: नक्षलवादाचा शेवट निर्णायक टप्प्यावर!

Milk Adulteration: भेसळीचा गोरखधंदा

Eggs Incubator: टाकाऊतून टिकाऊ अंडी उबवण यंत्राचा ‘जुगाड’

SCROLL FOR NEXT