Maratha Andolan : लाठीचार्जचे आदेश देणारे ३ पोलिस अधिकारी सस्पेंड, सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

Manoj Jarange Protest : मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा आज १५ वा दिवस आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण तापले असून राज्य सरकारच्यावतीने सोमवारी रात्री सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारच्यावतीने माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि मंत्री संदीपान भुमरे उपोषण स्थळी दाखल झाले.
manoj jarange
manoj jarangeAgrown
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्याने सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले. तसेच लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या ३ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

manoj jarange
Maratha Reservation : जालना लाठीचार्जच्या निषेधार्थ आज ठाणे बंद , 16 सप्टेंबरला मराठवाडा चक्क जामची हाक

जालनातील लाठीचार्जनंतर मराठा समाज आक्रमक झाला. ठिकठिकाणी बंद, रास्तारोको आणि चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. आरक्षणाचा मुद्दा तापला असताना यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीष महाजन, दादाजी भुसे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब, राजेश टोपे, चंद्रशेखर बावनकुळे, राजू पाटील, विनोद निकोले, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, सुनील तटकरे, गौतम सोनवणे आदी उपस्थित आहेत.

कोणत्या मुद्द्यांवर चर्चा ?

  • मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे

  • आंदोलनस्थळी झालेल्या लाठीचार्ज करणाऱ्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल खाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव आणि आणखी एका अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात यावे

  • लाठीचार्जनंतर झालेल्या हिंसक घटकांमध्ये आंदोलनकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com