Panchganga River Pollution agrowon
ॲग्रो विशेष

Panchganga River Pollution : पंचगंगा नदीत रसायन मिश्रीत पाणी; प्रदुषण मंडळ निवांत, नागरिकांच्या जिवाशी खेळ

Chemically Mixed Water : पंचगंगा नदीचे तेरवाड बंधाऱ्यातून वाहत असलेले नदीचे पाणी फेसाळयुक्त पांढरे झाले आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Pollution Board : कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्य नदी असलेल्या पंचगंगा नदी वारंवार दुषीत होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी पंचगंगा नदीत केमिकल मिश्रीत पाणी सोडल्याने लाखो मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा नदीला फेसाळलेले पाणी आल्याने नदी पूर्ण प्रदुषीत झाली आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसात झालेल्या पावसाने लाल आणि गढुळ पाण्याबरोबर आता फेसाळलेलं पाणी आल्याने नागरिकांनी पाणी कुठलं प्यायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी फेसाळत बाहेर पडत असून, पाण्याला उग्र वास सुटला आहे. नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर प्रदुषण नियंत्रण मंडळाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांतून होत आहे. दोन दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार सलामी दिली. त्यामुळे पंचगंगा नदीपात्रात नवे पाणी आले असून त्या पार्श्वभूमीवर प्रदूषित घटकांनी डाव साधत रसायनमिश्रित सांडपाणी नदीपात्रात सोडले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कोल्हापूरपासून ते तेरवाड बंधाऱ्यापर्यंत अनेक गावचे सांडपाणी, इचलकरंजी व कोल्हापूर महापालिकांचे सांडपाणी, विविध औद्योगिक वसाहतीचे रासायनिक पाणी पंचगंगा नदीत सोडले जात असल्यानेच पंचगंगेची गटारगंगा होत असल्याचा आरोप पंचगंगा नदी बचाव संघटना व पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून केला जातो.

आज पहाटेपासून पंचगंगा नदीचे तेरवाड बंधाऱ्यातून वाहत असलेले नदीचे पाणी फेसाळयुक्त पांढरे झाले आहे. बंधाऱ्याच्या अलीकडचे इचलकरंजीपर्यंतचे पात्र जलपर्णीने नदीपात्र व्यापले आहे. बंधाऱ्याच्या पुढे कुरुंदवाडच्या दिशेने जलपर्णीच्या आडून प्रदूषित घटकांनी आपले रासायनिक पाणी सोडलेले स्पष्ट होते आहे. हे रसायनमिश्रित सांडपाणी फेसाळत आहे. त्यामुळे नदी फेसाने झाकली गेली आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नदीला पाणी वाढणार असल्याने प्रदूषित घटकांनी आपले रासायनिक पाणी मोठ्या प्रमाणात विना प्रक्रियाच थेट नदीत सोडल्याचा आरोप शेतकरी आणि नागरिकांतून होत आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाने याबाबत गांभीयनि विचार करून प्रदू‌षित घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पंचगंगेमुळे कृष्णाही प्रदूषित

पंचगंगेचे पाणी प्रदूषित, फेसाळलेले आहे. हेच पाणी शिरोळ बंधारा पुलाखालून नृसिंहवाडीपर्यंत जाते आणि तेथे पंचगंगेचा कृष्णेशी संगम होतो. प्रदूषित पंचगंगेमुळे कृष्णाही प्रदूषित होत चालली आहे.

इचलकरंजी महापालिकेवर कारवाई करण्याची मागणी

इचलकरंजी टाकवडे वेस परिसरातून विनाप्रक्रिया मैलायुक्त सांडपाणी काळ्या ओढ्यातून थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याला जबाबदार धरून इचलकरंजी महापालिकेवर फौजदारी गुन्हा दाखल करावी, अशी मागणी पर्यावरणवादी कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी केली. त्यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विभगीय आयुक्तांना पाठविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT