Ashadhi Vari Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Vari : पालखी सोहळ्यास पाणीपुरवठा होणाऱ्या स्रोतांची तपासणी करा

Ashadhi Vari Water Supply : श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज तसेच अन्य संताच्या पालख्याबरोबर आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपूरात मोठ्या संख्येने वारकरी, भाविक येतात.

Team Agrowon

Solapur News : श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज तसेच अन्य संताच्या पालख्याबरोबर आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपूरात मोठ्या संख्येने वारकरी, भाविक येतात.

पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या भाविकांना पालखी मार्गावर, तसेच पंढरपूर शहरात व परिसरात स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाणी मिळावे, यासाठी पालखी मार्गावरील तसेच शहरातील पाणीपुवठा करणाऱ्या जलस्रोतांची तपासणी करावी, अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.

आषाढी यात्रा कालावधीत पालखी मार्ग तसेच शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थापनाबाबत प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्यांनी या सूचना दिल्या.

या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, महावितरणचे कार्यकारी अभियंता बी. ए. भोळे उपस्थित होते.

श्री. गुरव म्हणाले, की पंढरपूर तालुक्यात पालखी मार्गावर ७१९ जलस्रोत व टँकर भरण्यासाठी १२ ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. तसेच आषाढी यात्रा कालावधीसाठी मुबलक पाणीपुरवठा यासाठी पंढरपूर शहर व परिसरात ३६ बोअरवेल, ५० हातपंप, टॅकर भरण्यासाठी दोन ठिकाणे व ६५ एकर येथील पाणीपुरवठा व्यवस्था नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.

या सर्व ठिकाणच्या जलस्रोतांची तपासणी करावी. तसेच ज्या ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य अशा ठिकाणी ठळक माहिती फलक लावावेत. पालखी मार्गावरील टँकर भरण्याच्या ठिकाणी कोणताही अडथळा येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले. पाटबंधारे विभागाने वारी कालावधीत नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचनाही प्रांताधिकारी श्री. गुरव यांनी या वेळी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT