Ashadhi Vari : दूषित पाण्यातच करावे लागणार तीर्थस्नान

Vari Update : आषाढी वारी अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. नियोजनासंदर्भात पालकमंत्री आणि प्रशासनाच्या बैठकाही झाल्या.
Ashadhi Vari
Ashadhi VariAgrowon
Published on
Updated on

Alandi Ashadhi Vari News : आषाढी वारी अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. नियोजनासंदर्भात पालकमंत्री आणि प्रशासनाच्या बैठकाही झाल्या. त्यानंतरही आळंदी येथील इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडण्याचे प्रमाण कमी झाले नाही.

ते वेळीच थांबवले नाही, तर अशा रसायनयुक्त सांडपाण्यातच वारकऱ्यांना येत्या आषाढी वारीत तीर्थस्नान करावे लागणार आहे.

Ashadhi Vari
Pandharpur Chaitri Vari : चैत्री वारी दोन दिवसांवर, पंढरीत वारकऱ्यांची वर्दळ

आळंदीतील इंद्रायणी प्रदूषणाचा प्रश्न गेली काही वर्षे वाढतच चालला आहे. पिंपरी महापालिका हद्दीतील आणि तळेगाव, लोणावळा, देहू, आळंदी, चिंबळी, केळगावचे नागरिकरण वाढले आहे. परिणामी शहरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे.

चिखली कुदळवाडीतून हक्क असल्याप्रमाणे हजारो लिटर सांडपाणी सोडले जात आहे. परिणामी चिंबळी ते आळंदी आणि आळंदी ते तुळापूर नदीपात्र काळवंडले आहे. तसेच जलपर्णीही बेसुमार वाढली.

आळंदीत सध्या नदीच्या पाण्यावर काळपट तवंग आणि फेस आला आहे. दरम्यान, पालकमंत्री, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, जिल्हा प्रशासन, आळंदी देहू देवस्थान आणि वारीतील नियोजनाच्या बैठकानंतरही सांडपाणी सोडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. चार आठवड्यांपूर्वी इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले.

त्यावेळी उपाययोजनांबाबत आश्वासन प्रांताधिकाऱ्यांनी दिले. मात्र, पुढे काहीच झाले नाही. सध्या प्रदूषित पाण्याचा प्रवाह मोठा आहे आणि वारी अवघ्या दहा दिवसांवर आली आहे. राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना अशाच पाण्यात स्नान करावे लागणार असल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com