Ration shop Agrowon
ॲग्रो विशेष

Grain Subsidy : स्वस्त धान्य बंद, अनुदानही मिळेना

Cheap Grain Supply Update : एपीएल कार्डधारकांना मिळणारा स्वस्त धान्य पुरवठा मागील वर्षभरापासून शासनाकडून अचानक बंद करण्यात आला आहे.

Team Agrowon

Latur News : एपीएल कार्डधारकांना मिळणारा स्वस्त धान्य पुरवठा मागील वर्षभरापासून शासनाकडून अचानक बंद करण्यात आला आहे. या बदल्यात संबंधित लाभार्थ्यांना प्रति सदस्य महिना १५० रुपये अनुदान देण्याच्या अटीवर हे धान्य वाटप बंद करण्यात आले होते. परंतु अद्यापही यांपैकी बहुतांश कार्डधारकांना एक रुपयाचेही अनुदान मिळाले नसल्याचे समोर आले आहे.

परिणामी या योजनेतील लाभार्थ्यांना धान्य ही नाही अन् अनुदानही नाही अशी अस्वस्थता झाली आहे. त्यामुळे शासनाने प्रलंबित सर्व अनुदान वर्ग करावे आणि प्रत्येक महिन्याला नियमित अनुदान खात्यावर जमा करावे अशी मागणी या कार्ड धारकांकडून केली जात आहे.

मराठवाडा-विदर्भातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांसाठी अल्पदरात गहू, तांदूळ असा शिधा दिला जात होता.

परंतु एक वर्षापूर्वी नाममात्र दराने देण्यात येणारा शिधा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि त्याऐवजी दरमहा प्रति लाभार्थी १५० रुपये संबंधितांच्या खात्यावर जमा करणार आहेत. या धान्याऐवजी कार्डधारकांना प्रतिमहा प्रति सदस्य देण्यात येणाऱ्या १५० रुपये अनुदानापैकी एकही रुपया मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

एपीएल कार्डधारक कुटुंबातील महिला सदस्यांच्या खात्यावर सुरुवातीच्या तीन महिन्याचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झाले. सहकारी बँकेचे खाते असणाऱ्या ग्राहकांचे पैसे काही तांत्रिक अडचणीमुळे जमा झालेले नाहीत. पहिल्या टप्प्यातील संपूर्ण कार्डधारकांचे पैसे जमा झाल्यानंतर पुढच्या तीन महिन्याचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
लालासाहेब कांबळे, नायब तहसीलदार, औसा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT