Coarse Grain : भरड धान्याच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न

Coarse Grain Production : मानवी आहारात भरड धान्याचे महत्त्व लक्षात घेता त्याच्या उत्पादन वाढीकडे लक्ष केंद्रित केले जात आहे. तशी शिफारस राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केली.
Krishi College Programe
Krishi College ProgrameAgrowon
Published on
Updated on

Dhule News : मानवी आहारात भरड धान्याचे महत्त्व लक्षात घेता त्याच्या उत्पादन वाढीकडे लक्ष केंद्रित केले जात आहे. तशी शिफारस राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केली. त्यानुसार विद्यापीठाच्या शिफारसीत तंत्रज्ञानाचा उत्पादकांनी अधिकाधिक अवलंब करावा, असे आवाहन येथील कृषी महाविद्यालयातील कार्यक्रमातून झाले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी तंत्र विद्यालय आणि कृषी विभागातर्फे शनिवारी (ता. २३) आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जनजागृती शिवार फेरी काढण्यात आली. तसेच कृषी विभागाचे विस्तार अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कृषी विज्ञान केंद्रात सेंद्रिय, नैसर्गिक शेती या विषयावर प्रशिक्षण झाले.

Krishi College Programe
Millet Year 2023 : भरड धान्य आरोग्यासाठी फायदेशीर का ठरतात? कोणत्या आजारांना होतो प्रतिबंध?

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती शिवार फेरीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चिंतामणी देवकर अध्यक्षस्थानी होते.

Krishi College Programe
Coarse Grains : प्रकृती स्वास्थ्यासाठी पौष्टिक भरड धान्ये

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक नवनाथ कोळपकर, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल देसले, कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे, कृषीभूषण शेतकरी श्रीराम पाटील, दिलीप पाटील, प्राध्यापक, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.

मान्यवरांचे मार्गदर्शन

प्रशिक्षणात डॉ. देवकर यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सेंद्रिय शेतीमधील प्रकल्पाचे योगदान आणि संशोधनाविषयी मार्गदर्शन केले. डॉ. देसले यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी तंत्र विद्यालयाकडून होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. मानवी आहारातील भरड धान्याचे महत्त्व विशद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com