Flood  Agrowon
ॲग्रो विशेष

Flood Situation : पूर्व विदर्भात पूरस्थितीमुळे हाहाकार

Team Agrowon

Nagpur News : पूर्व विदर्भात सर्वदूर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. याचा सर्वाधिक फटका गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांना बसला असून, पुरात वाहून गेल्याने दोघांचा मृत्यू झाला. तर अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. तर अनेक मार्ग पूरस्थितीमुळे बंद झाले आहेत. खबरदारीच्या उपायाअंतर्गत प्रशासनाने मंगळवारी (ता. १०) शाळांना सुट्टी जाहीर केली होती.

गोंदिया शहरातील फुलचूर भागात वाहणाऱ्या नाल्याच्या काठावर अतिक्रमण करून घरे बांधण्यात आले होते. हे घर पडल्यानंतर या घरातील आई व मुलगा हे वाहून गेले. त्यांचा मृत्यू झाला असला तरी उशिरापर्यंत त्यांची नावे कळू शकली नव्हती. पुराच्या पाण्यात अडकलेल्या तिघांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुखरूप बाहेर काढले.

त्यामध्ये गंगा देसलाहरे सतनानी (वय ४०, रा. खैरागड, छत्तीसगड), देसलाहरी सतनानी (वय ४५, रा. खैरागड), अनिल सूर्यभान बागडे (शिरपूर बांध, ता. देवळी) याचा समावेश आहे. शिरपूर भागातील पुरात हे तिघेही अडकले होते.

देवरी येथे पेट्रोलची वाहतूक करणारा टॅंकर बाग नदीत वाहून गेला. तिरोडा तालुक्‍यातील निमगाव, इंदोरा, मांगेझरी हे रस्ते बंद आहेत. गोरेगाव तालुक्‍यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून नद्या, नाल्यांसह परिसरातील मामा तलाव तुडुंब भरले आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पावसामुळे १९ घरे, ७ गोठे यांचे अंशतः नुकसान झाले आहे.

इतर जिल्ह्यांत पिकांना फटका

गोंदियासह नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांतही पावसाची संततधार सुरू आहे. सोमवारी (ता. ९) रात्रीपासून पाऊस सुरू असला तरी या भागात स्थिती नियंत्रणात असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Irrigation Subsidy : सूक्ष्म सिंचनाच्या २०० कोटी रुपयांच्या अनुदान वितरणाला मान्यता

Narhari Zirwal Protest : आमदार नरहरी झिरवाळांचं धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित; सरकार विरोधातच थोपाटले होते दंड

Industrial Center : नरडाणा औद्योगिक केंद्राचा प्रश्‍न रेंगाळलेलाच

Land Dispute : जमिनीचे मतलबी वाटप ठरले अडचणीचे

Majhi Vasundhara : दहा ग्रांमपंचायतींना ‘माझी वसुंधरा’मधून ४ कोटींची बक्षिसे

SCROLL FOR NEXT