Flood Issue : पुराने उपजीविकेचे साधनच हिसकावून घेतले

Flood Update : शेतमजुरी तसेच शेळीपालनावर कुटुंबाचा गाडा चालत होता. पण करपरा नदीला मोठा पूर आला. त्यात ५० शेळ्यांसह गोठा पण वाहून गेला आहे.
Flood
FloodAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : शेतमजुरी तसेच शेळीपालनावर कुटुंबाचा गाडा चालत होता. पण करपरा नदीला मोठा पूर आला. त्यात ५० शेळ्यांसह गोठा पण वाहून गेला आहे. पुराने उपजीविकेचे साधनच हिसकून घेतले आहे. सरकारकडून मिळणाऱ्या तोकड्या मदतीवर भागणार नाही. आता शेळ्या पुन्हा विकत घेता येणार नाहीत, अशी व्यथा बोथ (ता. सेलू) येथील भूमिहीन शेळीपालक दशरथ जोगदंड यांनी व्यक्त केली.

सेलू तालुक्यातील वाई गटग्रामपंचायत अंतर्गत वाई आणि बोथ ही करपरा नदीच्या दोन्ही काठची गावे छोटी छोटी गावे आहेत. रविवारी (ता. १) अतिवृष्टी झाली. करपरा नदीला महापूर आला. वाई तसेच बोथ गावाच्या जमिनीवरील उभ्या पिकांमध्ये पुराचे पाणी शिरले. अनेक तास सोयाबीन, कपाशी, तूर, हळद पिके पाण्यात बुडाली. त्यावर गाळ जमा झाला. पूर ओसरला असला तरी पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पिके सडली आहेत.

Flood
Flood Damage : पूरबाधित क्षेत्राला शास्त्रज्ञांची भेट

सौर कृषी पंपाचे पॅनेल, तुषार संच, ठिबक संच, पाइप, मळणी यंत्र, बैलजोड्या यांचे नुकसान झाले. तर गाई, म्हशी, शेळ्या आदी पशुधन दगावले. पुरामध्ये १०० ते १५० कडब्याच्या गंजी वाहून गेल्या. सुक्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेच्या खोल्यांमध्ये पाणी शिरल्याने पुस्तके, फर्निचर आदी साहित्याचे नुकसान झाले आहे. नदीच्या दोन्ही बाजूने डांबरी रस्त्या झाला. परंतु नदीवर पूल बांधलेला नाही. पावसाळ्यात नदीच्या खोल प्रवाहातून चालत जावे यावे लागते. बोथ गावाच्या शेती, आर्थिक, शैक्षणिक विकासावर करपरा पुल नसल्यामुळे परिणाम झाला आहे. या बाबत बाबासाहेब डोंगरे म्हणाले की, शेतीपिके, सौलर पॅनेलचे नुकसान भरून येणारे नाही.

करपरा नदीच्या पुरामध्ये ज्वारीच्या दीड हजार पेंढ्या असलेली गंजी वाहून गेली. ट्रॉली, मळणी यंत्र वाहून गेले त्याबद्दल शासन काय नुकसानभरपाई देईल.
गजानन खरवडे, बोथ
Flood
Kolhapur Flood : शिरोळ तालुक्यात पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान वाटप सुरू
रात्री आलेल्या पुरामुळे घरातील गहू, ज्वारी या अन्नधान्यांसह शेतीमालाची मोठी नासाडी झाली. शेतीअवजारे वाहून गेलीत. उभी पिके वाया गेलीत. अन्नधान्य, अवजारे खरेदीसाठी पैसे आणायचे कुठून.
नारायण कांगणे, बोथ
रविवारी ढगफुटी झाली. गावाला पुराचा वेढा पडला. बैलजोड्या, दुधाळ जनावरे, कडब्याच्या गंजी, दुचाकी वाहून गेल्या. पूर ओसरला तरी नदी ओलांडताना कमरे एवढ्या पाण्यातून गावात ये-जा करावी लागते. शेतीमालाची वाहतूक करणे कठीण झाले आहे.
गजानन मुंडे, बोथ
बोथ गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम होऊन तीन वर्षे झालीत. परंतु करपरा नदीवर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटतो. सरकारने शेतकऱ्यांना पीकनुसानीची मदत करतेवेळी नदीवरील पुलाच्या कामास देखील तत्काळ मंजुरी द्यावी.
सुधीर आघाव, वाई-बोथ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com