America Election Agrowon
ॲग्रो विशेष

Ideology Of Americans : अमेरिकी जनमानसाची बदलती विचारधारा

America President Election : अमेरिकेत २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार कोण असणार याच्या चर्चा तापू लागल्या आहेत. रिपब्लिकन पक्षातर्फे पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्या पक्षांतर्गत मोठे लॉबिंग सुरू आहे.

संजीव चांदोरकर

Election In America : डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिलेली घोषणा ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन (मागा)’ जनमानसात चांगली रुजली आहे, असे सांगितले जाते. गेली अनेक दशके ‘आपण सर्व जगात जवळपास सर्वच क्षेत्रांत अत्युच्च स्थानावर आहोत, असलो पाहिजे’ अशी अमेरिकन मानसिकता घडवली गेली आहे. ही मानसिकता देशाच्या प्रगतीसाठी एकमेव नसला तरी एक महत्त्वाचा ड्रायविंग फोर्स आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकांच्या मनातील त्या इच्छेची नस पकडली आहे.

रिपब्लिकन पक्षात तर ‘मेक अमेरिकन ग्रेट अगेन (मागा)’ नावाच्या गटात अनेक मध्यमवर्गीय प्रोफेशनल्स, थिंक टँक्स, धोरणकर्ते सामील होत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना २०२४ च्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी या मागणीसाठी हा ‘मागा' गट पद्धतशीरपणे काम करत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार होत आहेः

- मेक्सिको देशाबरोबरच्या सीमेवरील कुंपण / भिंत पूर्णत्वाला नेणे.

- अमेरिकेमध्ये वस्तुमालाची निर्यात करणाऱ्या देशांच्या आयात मालावर, विशेषतः चीन, तगडा आयात कर लावणे. अमेरिकेतील उद्योगांना संरक्षण.

- अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना आपोआप नागरिकत्व मिळवून देणाऱ्या कायद्यात सुधारणा.

- प्रत्यक्ष करात कपात.

- नाटो करारात इतर सभासद राष्ट्रांना संरक्षण पुरविण्याची प्रमुख जबाबदारी अमेरिकेवर असते ती ढकलून सभासद राष्ट्रांना घ्यायला लावणे...

अशी मोठी यादी आहे

अमेरिकेन शासनातील उच्चपदस्थ अधिकारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला अडथळा आणू शकतील, याचा अंदाज या गटाला आहे. म्हणून त्यांना नोकरीतून काढून टाकण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना देऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्यक्तिगत बांधिलकी मानणारे अधिकारी समांतरपणे (लॅटरल) भरती करण्याचा प्रस्ताव आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी नक्की मिळेल कि नाही? का त्या पक्षातच असणारे ट्रम्प विरोधक ती कल्पना खुडून टाकतील? समजा ट्रम्प यांनी निवडणूक लढवलीच तरी ते जो कोणी डेमोक्रॅटिक उमेदवार असेल त्याला हरवून राष्ट्राध्यक्ष बनतील का? अगदी निवडून आलेच तरी त्यांचा वरील अजेंडा अमलात येऊ शकेल का? असे सगळे जर तरचे प्रश्‍न आहेत.

अर्थात, डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होतील का, यापेक्षा अमेरिकेत कोणती विचारधारा मूळ पकडत आहे, हा या निमित्ताने ऐरणीवर आलेला विषय अधिक महत्त्वाचा आहे. कारण ‘मागा’ गटाचा वरील अजेंडा अमेरिकेच्या पायाभूत राजकीय मूल्यव्यवस्थेला आव्हान देऊ शकतो.

अमेरिकेसारख्या देशात अतिरेकी राष्ट्रवाद जो वंशवादी रंग कधीही परिधान करू शकतो खुन्नस काढत सत्तेवर आला तर त्याच्या प्रतिक्रिया चीनसकट अनेक राष्ट्रांत उमटतीलच. त्याशिवाय देशादेशांतील संकुचित, बहुसंख्याकवादी राजकीय शक्तींना बळ देणाऱ्या सिद्ध होतील.

अमेरिकेतील शासक वर्ग असणारी, अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीयत्वात स्वतःचे आर्थिक, व्यापारी, भांडवली हितसंबंध असणारी कॉर्पोरेट/ वित्त भांडवलशाही डोनाल्ड ट्रम्पच्या संकुचित, वंशवादी, राष्ट्रवादाला किती सहन करण्याच्या तयारीत आहे हा कळीचा प्रश्‍न आहे. त्यावर बरेच काही निर्भर आहे.

गेली अनेक वर्षे जे पी मॉर्गन इन्व्हेस्टमेंट बँकेचे सर्वेसर्वा जेमी डिमॉन या शासक शक्तींचे प्रवक्तेपण करत असतात. इकॉनॉमिस्ट नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष होण्याच्या विचाराने आपण चिंतीत आहोत असे ते म्हणाले आहेत.

६७ वर्षांचे जेमी डिमॉन डेमोक्रॅटिक पक्षातर्फे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवतील का, अशादेखील पुड्या सोडल्या जात असतात. त्या पुड्या पोकळ नसाव्यात. अमेरिकेत गेली अनेक वर्षे जमिनीखाली असणारी अतिरेकी राष्ट्रवादी/ वंशवादी विचारधारा आता जमिनीवर येऊन आम्हीच खरे म्हणू पाहत आहे. त्याच्याशी भारतात घडत असणाऱ्या सामाजिक, राजकीय घटना पडताळून पाहता येतील. अर्थात, एक महत्त्वाचा फरक उरतोच. भारतात शासक वर्ग कणाहीन आहे आणि आपल्याकडे एकही जेमी डिमॉन नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT