Khadi Gramodyog  Agrowon
ॲग्रो विशेष

Khadi Gramodyog Board : खादी, ग्रामोद्योग मंडळ टाकतेय कात

Agriculture News : १९६० मध्ये स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आता बदलू पाहत आहे. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता वाढीसाठी कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रम आखण्यात आला आहे.

Team Agrowon

Nashik News : १९६० मध्ये स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आता बदलू पाहत आहे. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता वाढीसाठी कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्याची सुरुवात नाशिकमधून झाली. प्रशिक्षणाचे आयोजन करून कामकाजाची व्याप्ती वाढवण्याचे धोरण मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी आखले आहे. त्यामुळे खादी ग्रामोद्योग मंडळ कात टाकत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नाशिकमध्ये प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था येथे प्रशिक्षणाचे आयोजित करण्यात आले होते. या वेळी सभापती साठे हे स्वतः उपस्थित होते. त्यांनी या वेळी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सुधीर केंजळे उपस्थित होते.

साठे म्हणाले, की ग्रामीण भागात खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसह आर्थिक उन्नतीसाठी मंडळाने धोरण आखले आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा असून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास, समूह बांधणी व कार्यक्षमता विकास हे उद्देश समाविष्ट आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत राज्यातील ३०० कर्मचाऱ्यांना विभागनिहाय प्रशिक्षण देण्यात येत आहे.

‘हर घर खादी घर घर खादी’

ग्रामीण भागात खादी उत्पादनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी उत्पादनांचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.‘खादीच्या वस्तू वापरा, कारागिरांना प्रोत्साहन द्या’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे गृहपयोगी, खाद्य व इतर उपयुक्त वस्तूंचा ग्राहकांनी अवलंब करावा.

खादीच्या उत्पादनाची व्यापकता वाढवण्यासाठी ‘हर घर खादी, घर घर खादी’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे या वेळी साठे यांनी सांगितले. यासाठी २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान मंत्रालयात खादी उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित केल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

साठे यांनी सांगितले, मंडळाचे आगामी धोरण

महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात खादी यात्रा काढणार

खादी मित्र योजनेच्या माध्यमातून प्रचार प्रसार

राज्यातील फॅशन डिझायर महाविद्यालयांच्या माध्यमातून खादीचा प्रचार

मधाचे गाव संकलावनच्या माध्यमातून व्यापकता वाढविणार

नाशिक जिल्ह्यातील चाकोरी (ता. त्र्यंबकेश्र्वर) येथे मधाचे गाव प्रस्तावित

शेतीमाल प्रक्रियाकामी कृषी व खादी ग्रामोद्योग विभागाचा समन्वय साधण्यात येणार

कृषी, आदिवासी, फलोत्पादन अशा विभागांशी चर्चा करून समन्वयाने काम करण्याची गरज, सामूहिक पद्धतीने करण्यासाठी शासकीय पातळीवर सचिवांच्या उपस्थितीत चर्चा.

राज्यातील खादी उत्पादनांचे निर्माते, मधपाळांचा तपशील एकत्रित करून त्याची माहिती संकलित करणार

हात कागदाचा निर्मितीसह वापर वाढवण्याकरता प्रयत्न

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CM Women Employment Scheme: बिहार सरकारच्या ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेतून महिलांना मिळणार १० हजार रुपये

Crop Insurance : पीकविम्याची थकित १६० कोटी भरपाई वाटप करा

Cashew Crop Insurance : विमा परताव्याची रत्नागिरीत ३६ हजार बागायतदारांना प्रतीक्षा

Illegal Fishing : अवैध मासेमारीला चालना मिळणार

Kadba Kutti Machine Scheme: शेतकऱ्यांना सरकारकडून कडबा कुट्टी मशीनवर मिळणार ५० टक्के अनुदान

SCROLL FOR NEXT