Sangli News : शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात २४ तासांत १०३ तर चरण येथे ९४ मिमी पाऊस झाला असून सलग दोन दिवस अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे वारणा धरणात २१.३८ टीएमसी म्हणजे ६२.१४ टक्के पाणीसाठा झाला आहे.
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुका वगळता इतर तालुक्यात हलका पावसाने हजेरी लावली. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणात पाणीसाठा झपाट्याने वाढत असून एका दिवसात १ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. मांगले-सावर्डे दरम्यानचा बंधार पाण्याखाली गेला आहे.
धरणात पाण्याची आवक १३,७७७ क्युसेकने वाढली असून वारणा जलविद्युत प्रकल्पातून १,७३० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. शिराळा तालुक्यातील कोकरूड व शाहुवाडी तालुक्यातील रेठरे दरम्यानचा वारणा नदीवरील बंधारा सहा दिवसांपासून पाण्याखाली असल्याने दोन्ही तालुक्यांतील काही गावांचा जवळचा संपर्क तुटला आहे.
जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात मंगळवारी (ता. २४) जोरदार पाऊस झाला. इतर भागांत हलक्या पावसाने हजेरी लावली. बुधवारी (ता. २५) दिवसभर ढगाळ वातावरण होते. शिराळा तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे.
तालुकानिहाय झालेला पाऊस (मिमी) ः मिरज-५.५, जत-०.५, खानापूर-विटा-१.२, वाळवा-११.६, तासगाव-२, शिराळा-४७.५, आटपाडी-४.८, कवठेमहांकाळ-२.५, पलूस-४.२, कडेगाव-२.७
शिराळा तालुक्यातील मंडलनिहाय पडलेला पाऊस (कंसात एकूण पाऊस मिमीमध्ये)
कोकरूड ५५.५ (४२९.६)
शिराळा ४८ (२७०.९)
शिरशी ४६ (३५९.८)
मांगले १५.५ (२२८.२)
सागाव २६.३ (२४४.६)
चरण ९४ (६७०.६)
वारणावती १०३ (८१३)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.