Irrigation Department Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Department In Kolhapur : ‘चंदगड पाटबंधारे विभागा'कडून ऊस बिलांतून परस्पर पाणीपट्टी वसूल

चंदगड पाटबंधारे विभागाने ऊस बिलांतून परस्पर पाणीपट्टी वसूल केली आहे. साखर कारखान्यांकडून पाणीपट्टीची रक्कम कपात करून घेतली आहे.

Team Agrowon

Kolhapur News : चंदगड पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) ऊस बिलांतून परस्पर पाणीपट्टी वसूल केली (Water tax recovery) आहे. साखर कारखान्यांकडून पाणीपट्टीची रक्कम कपात करून घेतली आहे. कपात केलेल्या रकमेच्या पावत्या मात्र अद्याप शेतकऱ्यांना दिल्या नाहीत.

पाटबंधारे विभागाने जमिनीची मोजणी न करता सरसकट पाणीपट्टीची रक्कम आकारून ऊस बिलांतून ती वसुल केली असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना अंधारात ठेवून पाणीपट्टीची रक्कम वसुली करणाऱ्या पाटबंधारे विभागाची चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

पाटबंधारे विभागाकडून अनेक वर्षांपासून चंदगडमधील शेतकऱ्यांकडून ऊस बिलांतून पाणीपट्टी वसूल केली जाते. जमिनीच्या क्षेत्राची मोजणी न करता पाणीपट्टीची रक्कम वसूल केली जात असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

कारखान्याच्या ऊस बिलांतून दरवर्षी ही रक्कम कपात करून घेतली जाते. मात्र कपात केलेल्या रकमेच्या पावत्या शेतकऱ्यांना दिल्या जात नाहीत. त्यामुळे पाणीपट्टीच्या नावाखाली कपात होत असलेली रक्कम नेमकी जाते कुठे; असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

पाणीपट्टीची रक्कम शेतकऱ्यांना कल्पना देऊन वसूल करावी व कपात केलेल्या रकमेच्या पावत्या शेतकऱ्यांना द्याव्यात; अशी शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे.

काही वर्षांपासून सरसकट सर्वच शेतकऱ्यांच्या बिलांतून पाणीपट्टीची रक्कम अंदाजे आकारून वसुल केली जात आहे.

जमिनीच्या क्षेत्राची मोजणी न करता ही कपात होत असल्याने यामध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यावर्षीही अर्थव, इको-केन व ओलम साखर कारखान्याकडील शेतकऱ्यांच्या ऊस बिलांतून १ कोटी १५ लाख १३ हजार रुपये इतकी रक्कम कपात झाली आहे.

पण अद्याप कपात केलेल्या रकमेच्या पावत्या शेतकऱ्यांना दिलेल्या नसल्याने पाटबंधारे विभागाचा सावळा गोंधळ समोर येत आहे. पाणीपट्टीची रक्कम अवास्तव आहे तसेच ती चुकीच्या पद्धतीने वसूल केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पिकाचे क्षेत्र कमी आहे. त्यांनाही याचा आर्थिक फटका बसत आहे. पाणीपट्टीची अवास्तव आकारणी होत असल्याने शेतकरी संतापले आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ विभागाने याची तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांतून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2026 : पावसाची तूट, पेरणीला फटका; कापूस आणि सोयाबीन लागवड पिछाडीवर

Goat Farming: शेळीपालनातून मिळविले आर्थिक स्थैर्य

Farmer Success Story: गावरान लसूण उत्पादनातून मिळविली वेगळी ओळख

Environmental Conservation: वृत्तांत उप्पुगल गाव भेटीचा!

MGNREGA: ‘राम’भरोशावर रोजगार!

SCROLL FOR NEXT