Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

Weather News : राज्यात पावसाला पोषक हवामानामुळे ढगाळ आकाश होत आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे.

Team Agrowon

Rain Update : पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामानामुळे ढगाळ आकाश होत आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे. आज (ता. ६) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने, शुक्रवारी (ता. ५) राजस्थानमधील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंडीगड, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये तीव्र थंडीच्या लाटेबरोबरच दाट धुके पसरल्याचे चित्र आहे. उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील थंडी ओसरली असून, शुक्रवारी (ता. ५) निफाड येथील गहू संशोधन केंद्र व गोंदिया येथे राज्यातील नीचांकी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमान १४ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. आज (ता. ६) राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता कायम आहे.

लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यापासून उत्तर कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण गुजरातपासून राजस्थान मधील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ६) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३०.४ (१४), धुळे २९ (१४), जळगाव २९ (१७), कोल्हापूर २९.१ (१९.९), महाबळेश्‍वर २६.१ (१५.३), नाशिक २९.५ (१२.८), निफाड २८.५ (११), सांगली २९.४ (२०.२), सातारा ३०.२ (१७.२), सोलापूर ३२.१ (१९.३), सांताक्रूझ ३१ (१८.५), डहाणू २६.७ (१७.४), रत्नागिरी ३३.१ (२०.२), छत्रपती संभाजीनगर २९ (१५.६), नांदेड २९.६ (१८.२), परभणी २९.६ (१७.५), अकोला ३०.४ (१७.६), अमरावती २९ (१७.०), बुलडाणा २९.४ (१५.२), ब्रह्मपुरी ३०.३ (१५.५), चंद्रपूर २८.४ (१५), गडचिरोली २९ (१५.२), गोंदिया २७.८ (१४.८), नागपूर २७ (१५.५), वर्धा २७.५ (१७), वाशीम २९.६ (१५.६), यवतमाळ ३० (१५).


विजांसह पावसाची शक्यता :
जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT