Weather update Agrowon
ॲग्रो विशेष

Weather update : राज्यात पुन्हा पावसाची शक्यता...

महाराष्ट्रातील सर्व विभागांत मंगळवार ते गुरुवार (ता. १४ ते १६) या कालावधीत पावसाची शक्यता निर्माण होईल.

 डॉ. रामचंद्र साबळे 

Rain : या आठवड्याभरात महाराष्ट्रावर हवेचा दाब १००८ हेप्टापास्कल इतका कमी राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेय व ईशान्येकडून राहण्यामुळे या दोन्ही दिशेने ढगांची दाटी महाराष्ट्राच्या दिशेने येईल. सोबत मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणतील.

त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विभागांत मंगळवार ते गुरुवार (ता. १४ ते १६) या कालावधीत पावसाची शक्यता निर्माण होईल. कोकणातील ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांत ५ ते १४ मि.मी. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ७ ते १६ मि.मी. पावसाची शक्यता राहील.

मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, जालना, धाराशीव, लातूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत या आठवड्यातील काही दिवशी ५ ते २२ मि.मी. पावसाची शक्यता आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ४ ते ११ मि.मी. पावसाची शक्यता आहे.

मध्य विदर्भातील यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांत काही दिवशी १५ मि.मी., तर पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांत ८ ते २३ मि.मी. पावसाची शक्यता राहील.

पश्‍चिम महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत काही दिवशी १४ ते १८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता त्यानुसार शेती कामांचे नियोजन करणे गरजेचे आहे.

कोकण ः (Kokan Weather Update)

कमाल तापमान (Maximum temperature) सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस आणि रायगड जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील.

तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत किमान तापमान २७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत निरभ्र राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० टक्के, रत्नागिरी जिल्ह्यात ५७ टक्के, तर ठाणे व रायगड जिल्ह्यांत ३० ते ४२ टक्के आणि पालघर जिल्ह्यांत २५ टक्के इतकी कमी राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २१ ते २५ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत १२ ते १७ टक्के इतकी कमी राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा ईशान्य व आग्नेयेकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र ः

कमाल तापमान नाशिक व धुळे जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस आणि नंदूरबार जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर नंदूरबार जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील.

जळगाव जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १५ ते २० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते ११ टक्के इतकी कमी राहील.

वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किमी राहील. वाऱ्याची दिशा धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ईशान्येकडून, तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील.

मराठवाडा ः

कमाल तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. उष्णतेचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होईल.

किमान तापमान संभाजीनगर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, हिंगोली जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, तर धाराशिव, लातूर, नांदेड व जालना जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. परभणी जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस आणि बीड जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील.

धाराशिव व लातूर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता हिंगोली, जालना व संभाजीनगर जिल्ह्यांत १५ ते १८ टक्के इतकी कमी, तर बीड व परभणी जिल्ह्यांत २० ते २१ टक्के राहील. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २४ ते २८ टक्के राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ११ ते १५ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १४ किमी राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ ः

कमाल तापमान बुलडाणा जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस, तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस आणि अमरावती जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान वाशीम जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, तर अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता १७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १० टक्के राहील.

वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किमी राहील. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, तर अकोला जिल्ह्यात पूर्वेकडून व अमरावती जिल्ह्यात ईशान्येकडून राहील.

मध्य विदर्भ ः

कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील.

आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १९ ते २० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान उष्ण व कोरडे राहील.

वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ११ किमी राहील. वाऱ्याची दिशा यवतमाळ जिल्ह्यात आग्नेयेकडून तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

पूर्व विदर्भ ः

कमाल तापमान चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील.

गडचिरोली जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ, तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २२ टक्के, तर चंद्रपूर जिल्ह्यात २७ टक्के आणि गडचिरोली जिल्ह्यात ३७ टक्के राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते १२ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ५ ते ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांत आग्नेयेकडून, तर भंडारा जिल्ह्यात ईशान्येकडून राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र ः

कमाल तापमान कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व नगर जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस, तर पुणे जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, सांगली व पुणे जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील.

कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ, तर पुणे व नगर जिल्ह्यांत निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ५७ टक्के, सांगली व सातारा जिल्ह्यांत ३२ ते ३७ टक्के, तर नगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांत २१ ते २७ टक्के राहील.

सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० किमी व दिशा आग्नेयेकडून राहील.

कृषी सल्ला ः

- पाऊस आणि तापमानाचा अंदाज घेऊन सिंचनाचा कालावधी ठरवावा.

- पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतीमाल भिजणार नाही याची काळजी घ्यावी.

- फळबागांना सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.

- चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी मक्याच्या आफ्रिकन टॉल या जातीची लागवड करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: मक्याचा दर स्थिर; गाजर- भेंडीचे दर टिकून, आले दरात सुधारणा तर उडदाचे दर कमी

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’साठी जमिनीच्या मोजणीसाठी तंत्रज्ञानाचा वापर

Mulberry Cultivation : सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले तुती लागवडीचे क्षेत्र

Dudhana Dam Water Level : निम्न दुधना प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा

Marathwada Rain: मराठवाड्यात पाऊस उघडीप देणार; राज्यात पावसाचा जोर पुढील ५ दिवस कमीच राहणार

SCROLL FOR NEXT