Khandesh Rain : खानदेशात अनेक भागांत पाऊस

भडणे येथे लहान गारांसह पाऊस झाला. खरिपासह रब्बी हंगामाचेही नुकसान झाले आहे. शनिवारी रात्रभर या अवकाळी पावसाच्या सरी सुरू होत्या.
Rain Update
Rain Update Agrowon

Jalgaon News : खानदेशात शनिवारी (ता.४), रविवारी (ता.५) अनेक भागात सुसाट वारा, वादळासह पाऊस झाला. यात मका (Maize), गहू, कांदा, ज्वारी आदी पिके आडवी होऊन मोठी हानी झाली आहे.

शिंदखेडा तालुक्यातील भडणे, हतनूर व तावखेडा, तसेच धुळे तालुक्यातील धनूर, तामसवाडी, कौठळ, न्याहळोद व कापडणे परिसरात वादळी वाऱ्या‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

भडणे व तावखेडा परिसरात अधिक, तर कापडणे परिसरात काही अंशी रब्बीचे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करून पंचनामा करून मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांमधून होत आहे.

Rain Update
Khandesh Rain : खानदेशात वादळ, गारपिटीत पिके भुईसपाट

शनिवारी (ता. ४) रात्री दहाच्या सुमारास भडणे व हतनूर तसेच तावखेडा परिसरात वादळी वाऱ्यांसह ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह आलेल्या अवकाळी पावसाने झोडपले.

गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, मका, टरबूज, दादर या पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेला हरभरा, गहू व ज्वारीचे मोठे नुकसान होणार आहे.

भडणे येथे लहान गारांसह पाऊस झाला. खरिपासह रब्बी हंगामाचेही नुकसान झाले आहे. शनिवारी रात्रभर या अवकाळी पावसाच्या सरी सुरू होत्या.

शेतातील उभ्या पिकांना मोठा फटका बसणार असून, अजून दोन दिवस पावसाचे वातावरण असल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. रविवारी (ता. ५) अनेक भगात पाऊस झाला.

Rain Update
Maharashtra Budget Session 2023 : विधानसभेत अवकाळी पाऊस, कांदा खरेदीवरून खडाजंगी

सुसाट वाऱ्यामुळे शिंदखेडा, शिरपूर, जळगावमधील चोपडा, अमळनेर, जळगाव आदी भागात पिके भुईसपाट झाली. शिरपूर (जि.धुळे) भागात गारांच्या पावसाने नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात सोमवारी (ता.६) सकाळपासून ढगाळ वातावरण होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com