Weather Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Weather Update : विदर्भात अल्प पावसाची शक्यता, ढगाळ हवामान

Team Agrowon

डॉ. रामचंद्र साबळे

Weather News : या आठवड्यात महाराष्ट्रासह दक्षिण भारतावर हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतका कमी राहील. त्याच वेळी पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव राहिल्यामुळे आणि अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता असल्याने अरबी समुद्रावरील बाष्प उत्तर -पश्चिम भारतावर वाहून नेले जाईल. त्यामुळे उत्तर भारतात वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतील. उत्तर भारतात पावसाची शक्यता निर्माण होईल. मराठवाडा, विदर्भासह जळगाव व नांदेड जिल्ह्यातील बहुतांश सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहून, रविवारी अल्प पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व विदर्भात रविवारी आकाश अंशतः ढगाळ राहील. पूर्व विदर्भात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील, तर पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. सोमवार (ता. ४) पासून हवामानात स्थिरता येऊ शकेल. पश्चिम व मध्य विदर्भात हवामान अत्यंत कोरडे राहील. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग आणि पाण्याची गरज वाढेल. या आठवड्यात हवामान सकाळी थंड व दुपारी उष्ण राहील. वाऱ्याचा ताशी वेग सामान्यच राहील.

प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान थंड होत असून, इक्वेडोरजवळ ते २५ अंश सेल्सिअस राहील, तर नियालीजवळ ३० अंश सेल्सिअस राहील. तर हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सुमात्राजवळ ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे, तर बंदाएचजवळ ते ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असल्याने उन्हाळी हंगामात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे.

१) कोकण ः कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ अंश, रत्नागिरी जिल्ह्यात २९ अंश, रायगड व ठाणे जिल्ह्यात २८ अंश, पालघर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमान रत्नागिरी जिल्ह्यात १७ अंश; सिंधुदुर्ग, रायगड व पालघर जिल्ह्यात १६ अंश; ठाणे जिल्ह्यात ते १५ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात ८० टक्के; सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर जिल्ह्यात ७३ टक्के राहील. किमान सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३० ते ३७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० ते १२ कि.मी.; रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात ७ ते ९ कि.मी. राहील. त्याची दिशा वायव्येकडून राहील.

२) उत्तर महाराष्ट्र ः कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३१ अंश; धुळे जिल्ह्यात ३० अंश; जळगाव जिल्ह्यात २९ अंश; नंदुरबार जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व नंदुरबार जिल्ह्यात १३ अंश, तर नाशिक व जळगाव जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. कमाल सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ७५ टक्के; धुळे, नंदुरबार जिल्ह्यात ५० ते ५९ टक्के आणि जळगाव जिल्ह्यात ३७ टक्के राहील. किमान सापेक्ष आर्द्रता नाशिक व जळगाव जिल्ह्यात २० ते २४ टक्के; धुळे व नंदुरबार जिल्ह्यात १४ ते १८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १३ कि.मी. व दिशा नैर्ऋत्य व वायव्येकडून राहील.

३) मराठवाडा ः कमाल तापमान बीड आणि धाराशिव जिल्ह्यात ३४ अंश; लातूर, नांदेड व परभणी जिल्ह्यात ३३ अंश; हिंगोली व जालना जिल्ह्यात ३२ अंश; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड जिल्ह्यात १९ अंश; धाराशिव व लातूर जिल्ह्यात १८ अंश; परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर, नांदेड व परभणी जिल्ह्यात रविवारी आकाश ढगाळ राहील, तर नांदेड जिल्ह्यात ते सोमवारीही अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५१ टक्के; धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात ४० ते ४४ टक्के; नांदेड जिल्ह्यात ३२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात १२ ते १५ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहून ताशी वेग १० ते १५ कि.मी. राहील.

४) पश्चिम विदर्भ ः कमाल तापमान वाशीम जिल्ह्यात ३२ अंश;
अमरावती जिल्ह्यात ३३ अंश; बुलडाणा व अकोला जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात १६ अंश; अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. रविवारी वाशीम जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३४ ते ३९ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १५ ते १७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १३ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यात रविवारी १.२ मि.मी.पर्यंत पावसाची शक्यता आहे.

५) मध्य विदर्भ ः यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात रविवारी ०.५ ते ०.७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात ३२ अंश; वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश सर्वच जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३३ ते ३७ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १६ ते १९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

६) पूर्व विदर्भ ः चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी ४ मि.मी. पावसाची शक्यता असून, गोंदिया जिल्ह्यात २ मि.मी. व गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात ०.१ ते ०.३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ कि.मी. राहील. कमाल तापमान गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात ३२ अंश, गोंदिया जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर जिल्ह्यात ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा जिल्ह्यात १९ अंश; गोंदिया जिल्ह्यात २० अंश; चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश सर्वच जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ४० ते ४४ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ कि.मी. व वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

७) दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र ः कमाल तापमान सोलापूर जिल्ह्यात ३४ अंश; कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात ३३ अंश; पुणे व नगर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सोलापूर जिल्ह्यात १८ अंश; कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात १६ अंश; सातारा व नगर जिल्ह्यात १५ अंश; पुणे जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर जिल्ह्यात रविवारी आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता पुणे जिल्ह्यात ७१ टक्के; नगर जिल्ह्यात ६३ टक्के; कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात ५५ टक्के; सांगली व सोलापूर जिल्ह्यात ४२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १५ ते २० टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १४ कि.मी. व वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.

कृषी सल्ला ः
१) येणाऱ्या उन्हाळ्यातील पाण्याचा अंदाज घेऊन आतापासूनच ऊस, केळी, फळपिके, फळभाज्या अशा पिकांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे.
२) भेंडीची लागवड करावी.
३) चारा पिकांच्या लागवडी कराव्यात.
४) परिपक्व झालेल्या ज्वारी पिकाची कापणी करून मळणी करावी.
५) आर्थिकदृष्ट्या शक्य असल्यास पालेभाज्यांची लागवड शेडनेटमध्ये करावी. तुषार सिंचनाद्वारे पाणी द्यावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT