Chana Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Sowing : नगर जिल्ह्यात हरभऱ्याची पेरणी सरासरीपेक्षा अधिक

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात यंदा रब्बीत हरभरा पीक घेण्याला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. यंदा आतापर्यंत ९६ हजार २८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरीचा विचार करता संपूर्ण जिल्ह्यात सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पेरणी झाली असून नऊ तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पेरणी झाली आहे. कर्जत तालुक्यात हरभऱ्याचे यंदा सर्वाधिक क्षेत्र आहे.

नगर जिल्ह्यात ४ लाख ५८ हजार ६३५ हेक्टर सरासरी क्षेत्र असून यंदा रब्बी पेरणी सरासरीच्या आतच आहे. आतापर्यंत ९७.९३ टक्के म्हणजे ५ लाख ४९ हजार १६१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा रब्बीसाठी पुरेसा पाऊस नसल्याने दुष्काळी व कोरडवाहू भागात हरभरा पीक घेण्याला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

सर्वाधिक कर्जत तालुक्यात पेरणी झालेली असून सरासरीपेक्षा १२ टक्के अधिक पेरणी झाली आहे. कर्जतपाठोपाठ यंदा राहात्यात ३९ टक्के सरासरीच्या अधिक पेरणी झाली आहे. पारनेरला सरासरीच्या २२ टक्के अधिक, नगर तालुक्यात ३ टक्के अधिक, जामखेडला सरासरीच्या सत्तर टक्के अधिक, पाथर्डीला पंचवीस टक्के अधिक, अकोले तालुक्यातील ४८ टक्के अधिक व श्रीरामपुरला ५ टक्के सरासरीपेक्षा अधिक पेरणी झाली आहे. आता हरभरा पेरणीचा कालावधी संपला असल्याने हरभरा क्षेत्र वाढण्याची शक्यता नाही, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

तालुकानिहाय हरभरा क्षेत्र (हेक्टर)

नगर ः १० हजार ३९९, पारनेर ः ७ हजार ६५५, श्रीगोंदा ः ५ हजार ४७९, कर्जत ः १२ हजार १३६, जामखेड ः ६ हजार ४९५, शेवगाव ः ६ हजार ४३७, पाथर्डी ः १० हजार ००३, नेवासा ः ५ हजार ४७५, राहुरी ः २ हजार ८१२, संगमनेर ः ४ हजार २३७, अकोले ः ३ हजार २०७, कोपरगाव ः ५ हजार ३२८, श्रीरामपुर ः ५ हजार ९५०, राहाता ः १० हजार ३८५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT