Chana Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Sowing : थंडीमुळे हरभरा पेरणीस वेगात सुरुवात

Chana Farming : गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सुरू झालेल्या थंडीमुळे रब्बी हंगामात हरभऱ्याच्या पेरणीस सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Pune News : गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सुरू झालेल्या थंडीमुळे रब्बी हंगामात हरभऱ्याच्या पेरणीस सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत पुणे विभागात सरासरीच्या एक लाख ८२ हजार ११९ हेक्टरपैकी २१ हजार ८५५ हेक्टर म्हणजेच १२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. येत्या काळात या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

पुणे विभागात हरभऱ्याचे मोठे क्षेत्र आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून हरभरा पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत. यंदाही ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची अधिक पेरणी होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांकडून हरभरा पिकांमध्ये विद्यापीठाकडील विजय, विशाल यांसारख्या वाणाच्या पेरणी केली जात आहे.

चालू वर्षी जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असले तरी हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यातच पीककर्ज घेऊन रब्बीची तयारी केली जात आहे. अनेकांनी खते, बियाण्यांची खरेदी केली असून बैलाच्या व ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करत आहेत.

पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हरभरा पिकांची पेरणी केली. परंतु ज्या ठिकाणी ओल कमी आहे, अशा ठिकाणी लवकर पेरण्या केल्या जात आहेत. विभागात सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वाधिक पेरण्या झाल्या असून सरासरीच्या १० हजार ७०८ हेक्टरपैकी ३ हजार ९६६ हेक्टर म्हणजेच ३७ टक्के पेरणी झाली आहे.

तर अक्कलकोट, उत्तर सोलापूर, माढा, मंगळवेढा या तालुक्यांत पेरणीचे क्षेत्र वाढत आहे. उर्वरित या तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे. नगर जिल्ह्यातील पारनेर, कर्जत, जामखेड तालुक्यांत बऱ्यापैकी पेरणीस सुरुवात झाली आहे. तर कर्जत तालुक्यात हरभरा क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे.

उर्वरित तालुक्यात अजूनही पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात बऱ्यापैकी पेरणी झाली असून सरासरीच्या ३ हजार ६३० हेक्टरपैकी ५११ हेक्टर म्हणजेच १४ टक्के पेरणी झाली आहे. तर बारामती, पुरंदर तालुक्यातही पेरण्या वेग घेऊ लागल्या आहेत. उर्वरित तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे. ज्या ठिकाणी पेरणी झाली आहे, तेथे हरभरा पीक वाढीच्या अवस्थेत आहे.

जिल्हानिहाय झालेली हरभरा पिकांची पेरणी (हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी क्षेत्र झालेली पेरणी टक्के

नगर ८८,३७७ ९,०४७ १०

पुणे ३४,३३० १६१४ ५

सोलापूर ५९,४१२ ११,१९३ १९

एकूण १,८२,११९ २१,८५५ १२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT