Chana Seed : नांदेडला रब्बीसाठी हरभरा बियाणे वितरित

Rabi Season : कृषी विभागाच्या माध्यमातून रब्बी हंगाम २०२४-२०२५ साठी शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे योजनेतून आठ हजार ८४० क्विंटल तर हरभरा बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे.
Chana Crop
Chana CropAgrowon
Published on
Updated on

Nanded News : कृषी विभागाच्या माध्यमातून रब्बी हंगाम २०२४-२०२५ साठी शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे योजनेतून आठ हजार ८४० क्विंटल तर हरभरा बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. तर पीक प्रात्यक्षिक योजनेतून २१३ प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.

यात रब्बी ज्वारीचे १०२, जवस एक व मोहरीचे दोन अशा प्रकल्पाचा समावेश आहे. यंदा जिल्ह्याला करडई या पिकांचे बियाणे झाले, नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

जिल्ह्यात दरवर्षी शेतकऱ्यांना खरीप तसेच रब्बी हंगामात पेरणीसाठी बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येतात. यात यंदाही खरिपासह रब्बीमध्ये शेतकऱ्यांना महाडीबीडी पोर्टलवर मागणी नोंदविलेल्या शेतकऱ्यांना बियाणे वितरित करण्यात येणार आहे.

Chana Crop
Chana Cultivation : हरभरा लागवडीसाठी निवडा सुधारित वाण

अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके या योजनेत कडधान्य पिकासाठी रब्बी हंगाम २०२३-२०२४ अंतर्गत हरभरा प्रमाणित बियाणे (दहा वर्षांवरील) योजनेतून जिल्ह्याला आठ हजार ६० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. तर अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके या योजनेत कडधान्य पिकासाठी रब्बी हंगाम २०२४-२०२५ अंतर्गत हरभरा प्रमाणित बियाणे (दहा वर्षांच्याआतील) योजनेतून जिल्ह्याला ७८० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे.

Chana Crop
Chana Cultivation : बीबीएफ पद्धतीने हरभरा लागवड फायदेशीर

या दोन्ही योजनेतील हरभरा बियाणे सर्वच तालुक्यांना त्यांच्या लक्ष्यांकानुसार वितरित करण्यात आले आहे. यासोबतच जिल्ह्याला पीक प्रात्यक्षिक योजनेत रब्बी हंगाम २०२४-२०२५ अंतर्गत अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके यामध्ये (कडधान्य) हरभरा पिकाचे १०८ प्रकल्प, अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके या योजनेत पौष्टिक तृणधान्य पिकासाठी १०२ प्रकल्प, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (गळीतधान्य) योजनेअंतर्गत जवस पिकाचा एक प्रकल्प तर मोहरी पिकाचे दोन प्रकल्प असे एकूण २१३ प्रकल्प पीक प्रात्यक्षिक योजनेत राबविण्यात येत आहेत.

करडईचे बियाणे उपलब्ध झाले नाही

जिल्ह्यात दरवर्षी राष्ट्रीय खाद्यतेल अभियानात गळीतधान्य योजनेअंतर्गत करडईचे बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर वितरित करण्यात येत होते. या वर्षीही कृषी विभागाने करडईच्या अनुदानित बियाण्यांचा कार्यक्रम तयार केला होता. परंतु करडईचे बियाणे उपलब्ध झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे यंदा शेतकऱ्यांना बाजारात मिळणाऱ्या करडई बियाण्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com