Manikrao Kokate Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Minister Challenges : कृषिमंत्र्यांना पेलावे लागणार शिवधनुष्य

Agriculture Sector : विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप नागपुरात पार पडले. शेती क्षेत्राशी निगडित असलेले कृषी आणि सहकार ही दोन खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे तर पणन विभाग भाजपकडे गेला आहे.

बाळासाहेब पाटील

Nagpur News : विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप नागपुरात पार पडले. शेती क्षेत्राशी निगडित असलेले कृषी आणि सहकार ही दोन खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे तर पणन विभाग भाजपकडे गेला आहे.

मागील पाच वर्षांत तीन कृषिमंत्री मिळालेल्या कृषी विभागाला या वेळी पूर्ण वेळ कृषिमंत्री मिळेल अशी अपेक्षा आहे. आता माणिकराव कोकाटे यांच्यावर या विभागाची मोठी जबाबदारी पडली आहे. नव्यानेच मंत्रिमंडळात आलेले कोकाटे हे शिवधनुष्य कसे पेलणार याकडे आता लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर नाशिकच्या मालेगाव मतदार संघातून निवडून येत असलेल्या दादा भुसे यांच्याकडे कृषी मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. कोरोना काळामध्ये भुसे यांनी ही जबाबदारी पार पाडली. मात्र महसूल विभागा पाठोपाठ मोठी यंत्रणा असलेल्या कृषी विभागाची जबाबदारी भुसे यांना पेलवली नाही. राज्यात सत्तांतर होताच पुन्हा सत्तेमध्ये आलेल्या शिवसेनेत भुसे यांनी कृषी मंत्रिपद आपल्याला नको असा धोषा नेतृत्वाकडे लावला होता.

त्यामुळे त्यांना बंदरे आणि खनी कर्म व्यवसाय विभागाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी विभाग सोपविण्यात आला. मात्र सत्तार यांचा फटकळ स्वभाव आणि अगडबगड कार्यशैलीळे हा विभाग वादग्रस्त ठरला. सिल्लोड महोत्सवावरून यांच्यावर राजीनामाची वेळ आली होती. मात्र तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कृपेने सत्तार यांचे पद वाचले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर धनंजय मुंडे यांना कृषिमंत्री पद देण्यात आले. त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र मनासारखे काम होण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला. मुंडे यांनी सूत्रे घेण्याआधी काही महिने झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक रुपयात पीकविमा योजना राज्य सरकारने आणली होती. दोन खरीप, रब्बी हंगामांमध्ये ही योजना त्यांच्या काळात राबविली.

नुकताच या काळातील चाळीस हजार हेक्टरवरील बोगस पीकविमा घोटाळा भाजपच्या सुरेश धस यांनी काढला आहे. अधिवेशनात मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. त्यानंतरही अजित पवार यांनी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. महसूल विभागापाटोपाठ यंत्रणा असलेला कृषी विभाग सांभाळणे मोठे आव्हानाचे काम आहे. कृषी आयुक्तालय आणि मंत्रालय या दोन ठिकाणांवरून कारभार चालणाऱ्या या विभागावर पकड ठेवण्याची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

Early Banana Harvesting: आगाप कांदेबाग केळीची काढणी खानदेशात सुरू

Pandharpur ST Buses: आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसगाड्या

Coco Peat GST: बियाण्यांप्रमाणे कोकोपीटही जीएसटीमुक्त करण्यात यावे; राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशन

Collective Farming: कडूसच्या कृषी गटाकडून ‘सामूहिक शेती’

SCROLL FOR NEXT