Kunbi Record Agrowon
ॲग्रो विशेष

Kunbi Record : ‘मराठा-कुणबी’ प्रमाणपत्र वाटप हजारांच्या घरात

Maratha Reservation Update : कुणबी - मराठा, मराठा - कुणबी, कुणबी जात नोंदींचा शोध घेण्यात आला असून बीड जिल्ह्यात १३ हजार १२८ नोंदी आढळल्या आहेत. तर, जिल्ह्यात एक हजारांच्या घरांत कुणबी - मराठा प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे.

Team Agrowon

Beed News : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणणपत्र व आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनाची अंतिम दिशा शनिवारी (ता. २३) आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील येथील इशारा सभेतून निश्चित करणार आहेत.

तत्पूर्वी शासनाने त्यांना दिलेल्या आश्वासनानुसार कुणबी - मराठा, मराठा - कुणबी, कुणबी जात नोंदींचा शोध घेण्यात आला असून बीड जिल्ह्यात १३ हजार १२८ नोंदी आढळल्या आहेत. तर, जिल्ह्यात एक हजारांच्या घरांत कुणबी - मराठा प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे.

कुणबी - मराठा, मराठा - कुणबी व कुणबी जात नोंदी शोधण्यात आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात मराठवाड्यात बीड जिल्हा अव्वल आहे. मराठवाड्यात ता. सात डिसेंबरच्या अंतिम अहवालानुसार २८ हजार ६८५ कुणबी नोंदी आढळल्या आहेत. तर, २२६६ कुणबी - मराठा, मराठा कुणबी व कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. या दोन्ही आकड्यांच्या निम्मे आकडे एकट्या बीड जिल्ह्यातील आहेत.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे, या मागणीसाठीचे आंदोलन अंतिम टप्प्यात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे केलेल्या उपोषणानंतर न्या. (निवृत्त) संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा - कुणबी, कुणबी - मराठा व कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी समिती स्थापन केली आहे.

निजामकालीन दस्तऐवजांसह जन्ममृत्यू नोंदणी रजिस्टर (गाव नमूना १४), खासरा पत्रक, पाहणी पत्रक, जनगणना रजिस्टर, गाव नमुना क्रमांक सहा, प्रवेश निर्गम रजिस्टर, हक्क नोंदवही या १९१३ ते १९६७ पर्यंतच्या कागदपत्रांमध्ये मराठा - कुणबी, कुणबी - मराठा, कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांत जिल्हा स्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत),

कारागृह अधीक्षक, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पोलिस उपाधीक्षक (गृह), अधीक्षक भूमि अभिलेख, अधीक्षक उत्पादन शुल्क या अधिकाऱ्यांच्या समित्या काम करत होत्या. या समितीने जिल्ह्यातील विविध दस्तऐवजांत १३१२८ नोंदी शोधल्या आहेत.

दरम्यान, या नोंदींच्या अधारे संबंधीत कुटूंबियांच्या वारसांना कुणबी जात प्रमाणपत्र वाटप केले जात आहे. जिल्ह्यात ता. सात डिसेंबरच्या अहवालानुसार ९५५ कुणबी जात, मराठा - कुणबी, कुणबी - मराठा प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत हे जात प्रमाणपत्र वाटप केले जात आहे. बीड उपविभागात सर्वाधिक प्रमाणपत्रांचेही वाटप झाले आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत २८ हजार ६८५ कुणबी नोंदी आढळल्या आहेत. तर, २२६६ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. या दोन्ही आकड्यांत जिल्हा मराठवाड्यात अव्वलस्थानी आणि मराठवाड्याच्या एकूण कामाच्या निम्म्यावर आहे. दरम्यान, शिंदे समितीच्या निर्देशानुसार कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरु आहे. दोन जिल्ह्यात आणखी शोधण्याचे निर्देश दिलेले आहेत.

मराठवाड्यातील कुणबी नोंदी

(ता. सात रोजीच्या अंतिम अहवालानुसार)

जिल्हा सापडलेल्या नोंदी

बीड १३१२८

छत्रपती संभाजीनगर २३३७

जालना ३३१८

परभणी २८९१

हिंगोली ३४६८

नांदेड १२०४

लातूर ९०१

धाराशिव १४३८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT