Central Government Onion Rate : केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटविल्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याची झालेली दरवाढ पाहता केंद्र सरकारने घाऊक बाजारात 'बफर स्टॉक'मधून विक्री वाढविली आहे. कांद्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्राहक कल्याण खात्याच्या सचिव निधी खरे यांनी सोमवारी (ता.२३) सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
खरे पुढे म्हणाल्या की, "दिल्लीमध्ये मागील वर्षी सप्टेंबरमध्ये कांद्याचे दर प्रतिकिलो ३८ रुपये होते. ते वर्षभरात ५५ रुपये किलोवर पोहोचले आहेत. दिल्लीप्रमाणेच मुंबई आणि चेन्नईमध्ये देखील कांद्याचा दर अनुक्रमे ५८ आणि ६० रुपये प्रतिकिलो एवढा झाला आहे. केंद्र सरकारने दिल्ली आणि इतर प्रमुख शहरांत घाऊक बाजारात 'बफर स्टॉक'मधील कांद्याची विक्री सुरू केली".
केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात शुल्क २० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर कांद्याच्या निर्यात वाढीस चालना मिळू लागली आहे. त्यामुळे खानदेश व नाशिक भागातील कांदा आखाती देशात मागणी वाढत आहे. तसेच ६३ ते ६४ रुपये प्रतिकिलो भावाने कांद्याची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. यांसह बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका आदी देशांतूनही या कांद्याला मागणी वाढू लागली आहे. या मागणीत अजून वाढ होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
लासलगाव बाजार समितीत कांदा किमान ३६ रुपये तर जास्तीत जास्त ४७ रुपयांप्रमाणे विक्री होत असून साधारणपणे सरासरी ४ हजार ५५० रुपयाने ही विक्री सुरू आहे. विरोधकांनी निर्यातबंदीचा मुद्दा पुन्हा उचलून धरल्याने शासनाला सावध पवित्रा घेत निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. निर्यात सुरू झाल्यावर भावात थोडी सुधारणा झाली असून, नाशिक व परिसरातील कांदा ६१ ते ६४ रुपये तर मध्य प्रदेशातील कांदा ५८ ते ६१ रुपये प्रतिकिलो दरम्यान विक्री होऊ लागला आहे.
दक्षिण भारतातील कांद्यास ६२ ते ६४ रुपयाचे भाव मिळत असून कांद्याचे भाव सध्यातरी तेजीत राहण्याची परिस्थिती दिसून येत आहे. लासलगाव बाजार समितीत सध्या दररोजची आवक सुमारे दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल इतकी आहे. त्यामुळे येत्या महिनाभराचा विचार करता कांदा भाव खाऊन जाईल, अशीच आजची परिस्थिती दिसून येत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.