Chhatrapati Sambhajinagar: अति पावसामुळे फळबाग शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, शेतांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे, अनेक बागांत पाणी साचलेले असल्याने झाडांच्या मुळांची दमकोंडी होत आहे. त्यांची कार्यक्षमता ठप्प झाली आहे, त्यामुळे झाडांना शॉक बसून झाडे दगावण्याची भीती असल्याची माहिती हिमायतबाग केसर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रकल्प प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी दिली..Mango Orchard Management : अतिघन आंबा बागेत करावयाची कामे.छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चौका येथे ढगफुटीसदृश पाऊस झालेल्या आंबा बागांना डॉ. पाटील यांनी रविवारी (ता. १७) भेट दिली. त्या वेळी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. या वेळी त्यांच्यासमवेत केंद्राचे कृषी सहायक अनिल बकले, दिनेश घुले, भाऊसाहेब शिंदे, आंबा शेतकरी शेख शाहेद, भगवान वाघ, अंबादास मोरे, तुळशीराम पवार (विटेकरवाडी) आदींची उपस्थिती होती. .या वेळी डॉ. पाटील म्हणाले, की ढगफुटीसदृश पाऊस झालेल्या ठिकाणच्या फळबागांमधील साचून राहिलेल्या पाण्याची बागेबाहेर ताबडतोब विल्हेवाट लावणे महत्त्वाचे आहे. बागांमधील पाण्याचा निचरा केल्यास बागेत वाफसा स्थिती निर्माण होऊन झाडे दगावणार नाहीत, पाणी बाहेर काढल्यानंतर बागेत युरिया फेकून दिल्यास बागा लवकर वाफशावर येऊ शकतात, असा सल्ला त्यांनी दिला. या पाण्यामुळे अनेक फळबागांचे शेती-माती बांध सरसपाट झाल्याचे दिसून आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.