Pandharpur Yatra  Agrowon
ॲग्रो विशेष

Chaitra Wari : चैत्री वारीत चंद्रभागेत पवित्र स्नानाची पर्वणी

सुदर्शन सुतार

Pandharpur News : चैत्री एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून सुमारे दीड लाख भाविक पंढरीत दाखल झाले होते. एकादशीच्या दिवशी शुक्रवारी (ता. १९) लाखो भाविकांनी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नानाची पर्वणी साधली. दरम्यान, श्री विठ्ठलाच्या मुखदर्शनाची रांग आज एक नंबरच्या पत्रा शेडमध्ये गेली होती. श्रींच्या मुखदर्शनासाठी सुमारे तीन तास लागत होते.

चैत्र एकादशीची श्री विठ्ठलाची नित्यपूजा श्री विठ्ठल मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते, तर श्री रुक्मिणीमातेची नित्यपूजा ह.भ.प. श्री. प्रकाश जवंजाळ यांच्या हस्ते करण्यात आली.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सध्या जतन व संवर्धनाचे काम सुरू असल्याने श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद असून केवळ मुखदर्शन सुरू आहे. पदस्पर्श दर्शन बंद असल्याने चैत्री दशमी दिवशी मंदिर परिसरामध्ये भाविकांची तुरळक गर्दी होती.

पत्रा शेड दर्शन रांगेमध्ये पूर्ण शुकशुकाट होता. मात्र शुक्रवारी एकादशीच्या दिवशी राज्यभरातून सुमारे दीड लाख भाविक पंढरीत दाखल झाले. सध्या चंद्रभागा नदीच्या पात्रात मुबलक पाणी साठा असल्याने बहुतांश भाविकांनी नदीमध्ये एकादशीचे पवित्र स्नान केले.

त्यानंतर भाविक श्री विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी दर्शन रांगेकडे जाताना दिसून आले. दर्शनाची रांग आज एक नंबर पत्रा शेडमध्ये गेली होती.

दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर समितीच्या वतीने साबुदाणा खिचडी व लिंबू सरबत देण्यात आले. कडाक्याच्या उन्हापासून भाविकांना संरक्षण मिळावे, या करिता दर्शन रांगेवर कापडाचे आच्छादन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT