Cashew Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Orchard : सिंधुदुर्गात काजूला पुन्हा पालवी

Agriculture Weather : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या पाच सहा दिवसांपासून सुरू झालेली थंडी कायम असून या थंडीचे चांगले परिणाम शेतीसाठी दिसू लागले आहेत.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या पाच सहा दिवसांपासून सुरू झालेली थंडी कायम असून या थंडीचे चांगले परिणाम दिसून येऊ लागले आहेत. काजूला पुन्हा चांगली पालवी फुटली असून मोहरदेखील येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे काजू बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीची अपेक्षा असते. परंतु या वर्षी पाच सहा दिवसांचा अपवाद वगळता थंडीने दडी मारली होती. त्यामुळे आंबा, काजू हे पिके अडचणीत आली होती. अनेक ठिकाणी आंबा, काजूला मोहोरच आलेला नाही. त्यामुळे आंबा, काजू बागायतदार थंडीच्या प्रतीक्षेत होते.

थंडीअभावी ५० टक्के काजू पिकाला पालवीच आलेली नव्हती. त्यामुळे त्या काजूच्या झाडांना मोहरदेखील आला नाही. परंतु गेले पाच सहा दिवसांपासून जिल्ह्यात सुरू झालेली थंडी आज सातव्या दिवशीही कायम आहे.

या थंडीचे सकारात्मक परिणाम काजू बागांवर दिसून येऊ लागले आहे. ज्या काजूंना आतापर्यत पालवी आलेली नाही त्या झाडांना आता पालवी फुटू लागली आहेच, परंतु पूर्वी काही प्रमाणात आलेल्या झाडांना देखील आता पुन्हा पालवी आली आहे. त्यामुळे काजू बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

असे होते तापमान -

१६ जानेवारी – १३ अंश सेल्शिअस

१७ जानेवारी - १४ अंश सेल्शिअस

१८ जानेवारी- १४.५ अंश सेल्शिअस

१९ जानेवारी- १४ अंश सेल्शिअस

जिल्ह्यातील आंबा, काजूकरिता सध्याचे वातावरण पोषक आहे. कमाल आणि किमान तापमानातील फरक अधिक आहे. आंबा, काजू बागायतदारांनी सायकांळच्या वेळेत झाडांना पाणी द्यावे. याशिवाय कडक उन्हात झाडांचे सरंक्षण व्हावे याकरिता खोडांना बोर्डो पेस्ट लावावी.
डॉ. यशवंत मुठाळ, तांत्रिक अधिकारी, मुळदे संशोधन केंद्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT