Cashew Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Season: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Sindhudurg Cashew Production: सिंधुदुर्गातील काजू हंगाम अंतिम टप्प्यात आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मोहर करपल्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून २५ ते ३० टक्केच काजू उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News: सिंधुदुर्गातील काजू हंगाम अंतिम टप्प्यात आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मोहर करपल्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून २५ ते ३० टक्केच काजू उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे.

लांबलेल्या पावसामुळे या वर्षी काजूच्या झाडांना पालवी आणि मोहोर विलंबाने आला. त्यामुळे दरवर्षी जानेवारीत सुरू होणारा काजू हंगाम यावर्षी काही भागात फेब्रुवारी अखेरीला तर संपूर्ण जिल्ह्यात मार्चमध्ये सुरू झाला. मार्च अखेरीला काजुला बहर आला. त्यामुळे आता हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.

बहुतांश शेतकऱ्यांच्या बागेतील काजू बी निवडून झाली आहे. तर काही ठिकाणी पालापाचोळ्यात पडलेली बी एकत्र करण्याचे काम सुरू आहे. साधारणपणे २५ ते ३० टक्केच उत्पादनाचा अंदाज शेतकऱ्यांकडून सांगितला जात आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मोहर मोठ्या प्रमाणात आला होता. परंतु वाढलेले तापमान आणि अवकाळी पाऊस यामुळे मोहर पूर्णतः वाया गेला आहे. त्यामुळे काजू बीच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे.

उत्पादन कमी असले तरी या वर्षी काजू बीचे दर स्थिर राहिले आहेत. सध्या काजू बीला सरसकट १५५ ते १६५ रुपये, ‘वेंगुर्ला सात’ जातीच्या बीला प्रतिकिलो १७० ते १७५ रुपये तर ‘वेंगुर्ला चार’ जातीच्या बीला प्रति किलो १६० रुपये दर मिळत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी तीस ते चाळीस रुपये शेतकऱ्यांना अधिक मिळत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

District Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत ११६ वैध, तर ४४ अर्ज अवैध

Bhama Askhed Dam: भामा-आसखेडचे आवर्तन लांबणीवर

Farmers Demand: पीक विम्यातील ‘ट्रिगर’ काढून पाठीत खंजीर खुपसला

Seed Germination Testing: दर्जेदार रोपांसाठी बियाण्यांची उगवणक्षमता, जोम महत्त्वाचा

Brown Biorefinery: शेतावरील ‘ब्राउन बायोरिफायनरी’

SCROLL FOR NEXT