Cashew Season Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Season : सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगामाला प्रारंभ

Cashew Market : जिल्ह्यात काजू हंगामाला सुरुवात झाली असून जिल्ह्याच्या काही भागांत काजू बी परिपक्व होऊ लागली आहे.

एकनाथ पवार

Sindhudurg News : जिल्ह्यात काजू हंगामाला सुरुवात झाली असून जिल्ह्याच्या काही भागांत काजू बी परिपक्व होऊ लागली आहे. दरम्यान दोडामार्गात काजू बी प्रतिकिलो १२६ रुपये दर दिला जात आहे.

जिल्ह्यात लांबलेल्या पावसामुळे यावर्षी काजूला पालवी आणि मोहोर विलंबाने आला. त्यानंतर हवामान बदलाचा मोठा परिणाम काजू पिकावर झाला आहे. जिल्ह्यात दोन तीन टप्प्यांत काजूला मोहोर आल्यामुळे काजू हंगाम तीन टप्प्यात विभागणार हेदेखील स्पष्ट झाले आहे.

दरम्यान दोडामार्ग येथे नोव्हेंबरमध्ये आलेल्या मोहोराची काजू बी परिपक्व होण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्याच्या इतर भागांच्या तुलनेत दोडामार्ग तालुक्यात काजू बी लवकर परिपक्व होते. येथील वातावरण काजू पिकाला अधिक पोषक मानले जाते.

दोडामार्गप्रमाणे वेंगुर्ले तालुक्यात देखील काही ठिकाणी काजू बी परिपक्व होऊ लागली आहे. त्या तुलनेत इतर तालुक्यांत एखादा अपवाद वगळता काजू बी परिपक्व होण्यास अजूनही आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दोडामार्ग तालुक्यात काजू बीला प्रतिकिलो १२६ रुपये दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

हमीभावासाठी ३ फेब्रुवारीला बैठक

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील काजू बागायतदारांची बैठक कणकवली येथील गोपुरी आश्रम येथे झाली होती. या बैठकीत काजू बीला प्रतिकिलो २०० रुपये दर मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. याशिवाय जिल्ह्यातील विविध संघटनानी देखील मागणी केली होती. या अनुषंगाने ३ फेब्रुवारीला मंत्रालयात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT