Cashew Crop Management Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Production : संघटित चळवळ उभारण्याचा काजू उत्पादकांचा निर्धार

काजू बी दर घसरणीवरून जिल्ह्यातील बागायतदार आक्रमक झाले असून कारखानदार आणि व्यापाऱ्यांची दर ठरविण्याची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी उत्पादक ठोस भूमिका घेण्याच्या विचारात आहेत.

Team Agrowon

Sindhudurg News : आयात शुल्कात वाढ आणि काजूमध्ये होणारी भेसळ, काजूला हमीभाव याशिवाय अन्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी काजू उत्पादकांची संघटित चळवळ उभी करण्याचा निर्धार येथील काजू बागायतदारांनी (Cashew Producer) बैठकीत घेतला.

काजू बी दर (Cashew Seed Rate) घसरणीवरून जिल्ह्यातील बागायतदार आक्रमक झाले असून कारखानदार आणि व्यापाऱ्यांची दर ठरविण्याची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी उत्पादक ठोस भूमिका घेण्याच्या विचारात आहेत.

यासंदर्भात रविवारी (ता. २) वैभववाडीतील येथील श्री दत्त मंदिरात काजू उत्पादकांची बैठक झाली. माजी सैनिक विलास देसाई, काजू अभ्यासक प्रा. विवेक कदम, विजय रावराणे, मंगेश कदम, महेश रावराणे, उदय सावंत, इंद्रजीत परबत्ते आदींसह अनेक उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

बैठकीत घसरत चाललेल्या काजू बीच्या दरावर चर्चा झाली. काही बागायतदारांनी काजूवरील आयात शुल्क वाढविणे आणि आयात केलेल्या काजू बी वर प्रक्रिया करून तो सिंधुदुर्गातील जीआय मानांकन काजूवर खपविण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी शासन स्तरावर एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.

तर जिल्ह्यात ७२ हजार हेक्टर क्षेत्र काजू लागवडीखाली असून १ लाखाहून अधिक कुटुंबे काजुशी निगडित आहेत. असे असताना मोजक्या काजू कारखानदारांचे ऐकून शासन निर्णय घेत असेल तर काजू उत्पादकांनी संघटितपणे चळवळ उभी करण्याची गरज असल्याचे मत काहींनी व्यक्त केले.

हे दोन मुद्दे शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, पालकमंत्री यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत गावागावातील काजू उत्पादकांना एकत्र करणे, त्यांना या चळवळीचे महत्त्व समजावून सांगणे याविषयी ठोस भूमिका घेण्याचे ठरले. काजू उत्पादकांना चांगला दर मिळवून देणे, याशिवाय त्यांना विविध समस्या आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तात्पुरती समिती गठीत करण्यात आली.

या वेळी काजू उत्पादक दर घसरणीवरून मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे एकीकडे त्यांना योग्य दर मिळवून देणे आणि दुसरीकडे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यातील काजू उत्पादकांना एकत्र करणे हे काम करायचे असल्याचे विलास देसाई, विवेक कदम यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT