Crop Loan  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Payment : जळगाव जामोद कृषी बाजार समितीत शेतीमालाचे रोख चुकारे

APMC Payment : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आसलगाव यार्डमध्ये आता शेतमाल विक्रीला आणणाऱ्या शेतकऱ्यांना रोखीने चुकारे त्याच दिवशी मिळणार आहेत.

Team Agrowon

Buldana News : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आसलगाव यार्डमध्ये आता शेतमाल विक्रीला आणणाऱ्या शेतकऱ्यांना रोखीने चुकारे त्याच दिवशी मिळणार आहेत. या सुविधेला दसऱ्याच्या मुहूर्तावर मंगळवारी (ता.२४) प्रारंभ करण्यात आला.

जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाज़ार समितीचे आसलगाव येथे सबयार्ड आहे. त्याठिकाणी सभापती प्रसेनजित पाटील, संचालक मंडळाच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना आपल्या शेतमालांचे रोख रकमेच्या स्वरूपात चुकारे मिळू लागले.

बाजार समित्यात शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना चेकद्वारे चुकारे दिले जात होते. यामुळे विविध अडचणी निर्माण व्हायच्या. चेक वठवायला अनेकदा विलंब झाल्याने शेतकऱ्यांना चुकारे वेळेवर मिळू शकत नव्हते. परिणामी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागायचा.

त्यामुळे शेतकरी हिताचा विचार करीत सभापती आणि संचालक मंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तापासून रोख रकमेच्या स्वरूपात चुकारे देण्याचा निर्णय घेतला. त्याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत या निर्णयाचे स्वागत केले.

मंगळवारी (ता.२४) झालेल्या धान्य बाजारात स्वतः सभापती पाटील, संचालक दत्ता पाटील, विश्वासराव भालेराव, उल्हास माहोदे, महादेव भालतडक, प्रभात पाटील, मनोज राठी, शैलेश दैय्या, प्रशांत अवसरमोल आदी उपस्थित होते. या वर्षीचा हंगामातील सर्वात जास्त ४९२५ रुपये प्रतिक्विंटल दर सोयाबीनला यावेळी मिळाला.

शेतकऱ्यांना अनेकदा रोख चुकाऱ्यांची गरज होती. परंतु चुकारे चेकद्वारे होत असल्याने वेळेवर काम होत नव्हते. ही अडचण लक्षात घेता बाजार समितीने यापुढे बाजारातील शेतमालाचे चुकारे नगदी देण्याचा निर्णय घेतला. त्याला सर्वच घटकांनी चांगला प्रतिसाद दिला.
- प्रसेनजित पाटील, सभापती, बाजार समिती, जळगाव जामोद, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cultivation: अमेरिकेत सोयाबीन लागवड वाढणार

Jowar Arrival Increase: अहिल्यानगरला ज्वारीच्या आवकेत वाढ

Krushi Mitra Recruitment Scam: ‘कृषिमित्र’ नावाखाली बोगस भरतीचे पेव

Maharashtra Heatwave: कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा कायम

Bordeaux Paste: फळझाडांसाठी बोर्डो पेस्ट घरच्या घरी कसे बनवावे?

SCROLL FOR NEXT