Seed Festival  Agrowon
ॲग्रो विशेष

Black Market of Seeds : बियाण्यांचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार : अब्दुल सत्तार

Abdul Sattar : बियाण्यांचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

Team Agrowon

Bogus Seed Market : राज्यात माॅन्सून दाखल झाला असून अवघ्या काही दिवसांमध्ये संपूर्ण राज्यभरात पावसाला सुरुवात होणार नाही. दुसरीकडे शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू असताना अनेक जिल्ह्यामध्ये बियाणांचा काळाबाजार सुरू आहे. बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना आव्वाच्यासव्वा रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने अशा साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

कृषिमंत्री म्हणाले, राज्यात काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास येताच कृषी विभागाने दखल घेतली असून सदर प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे कृषिमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यभरात पथक स्थापन करण्यात आले असून बोगस बियाणे आणि खतांची साठेबाजी करणाऱ्या कृषी केंद्रांवर लक्ष ठेवून कार्यवाही करण्यात येत आहे. या पथकामध्ये कृषी, महसूल आणि पोलीस खात्यामधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कोणत्याही शेतकऱ्यांने व्यापाऱ्याविरोधात तक्रार केल्यास ती सत्य मानून त्याची पडताळणी करण्यात येणार आहे.

राज्यात अनेक वर्षांपासून बोगस बियाणांची विक्री होत असते. इतर राज्यातूनही बोगस बियाणे आणले जात आहे. रोखण्याचे प्रयत्न कृषी विभाग करीत आहे. त्यासोबत जे लोक अशा प्रकारचे काम करीत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई झाल्याशिवाय या घटनांना आळा बसणार नाही. शेतकऱ्याचा एक हंगाम खराब झाल्यास त्याला तीन वर्षांचे आर्थिक नुकसान होत असते. त्यामुळे त्यांना भरपाई तर मिळालीच पाहिजे. यासाठी राज्य सरकार येत्या अधिवेशनात नवीन कायदा करणार आहे. त्यामध्ये १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली असल्याचे मंत्री सत्तार यांनी सांगितले.

खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारात खते व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. अशातच गुणवत्तापूर्ण वाणाची बियाणे बाजारातून अचानक गायब झाली आहेत. अनेक ठिकाणी त्यांचा काळाबाजार होत असून शेतकऱ्यांना दुप्पट पैशांनी विकले जात असल्याने राज्य सरकारवर हल्ला चढवला. महागड्या भावाने शेतकऱ्यांना विकले जात असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. राज्य सरकाराने बियाणे व खतांच्या काळ्याबाजारावर आळा घाला, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT