Soil Health Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Health : जमीन, मातीची काळजी म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे

Soil Erosion : हवामान बदलामुळे कमी दिवसात जास्त पाऊस पडत आहे. या कमी कालावधीतील पडणाऱ्या जास्त पावसामुळे जमिनीची धूप होत आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : ‘‘हवामान बदलामुळे कमी दिवसात जास्त पाऊस पडत आहे. या कमी कालावधीतील पडणाऱ्या जास्त पावसामुळे जमिनीची धूप होत आहे. विविध कारणांमुळे जमिनीची सुपीकता कमी होऊन जमिनीचे आरोग्य खालावत आहे.

जमिनीची व मातीची काळजी घेणे म्हणजेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासारखे आहे,’’ असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी व्यक्त केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठात शाश्‍वत शेती आणि उपजीविकेची सुरक्षासाठी मृदा व्यवस्थापन या विषयावर राज्यस्तरीय दोनदिवसीय परिसंवाद झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील होते. आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटराव पवार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे मृदा व जल व्यवस्थापन विभागाचे सहायक महासंचालक डॉ. ए. वेलमुरुगन, पुणे येथील नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक डॉ. रश्मी दरड,

नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व जमीन नियोजनाचे संचालक डॉ. एन.जी. पाटील, अकोला कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, मृद विज्ञान विभाग प्रमुख डॉ. भीमराव कांबळे उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना डॉ. पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, की अन्नाचे दुर्भिक्ष होते त्या वेळी हरितक्रांती झाली आणि उत्पादन वाढले. पण यामुळे जमिनीचे आरोग्य खालावले. निसर्गाचा आणि जमिनीचा ऱ्हास इतका झाला आहे, की यामुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे.

या वेळी डॉ. शरद गडाख, डॉ. संजय भावे, रश्मी दरड, डॉ. एन.जी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात मातीचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. भीमराव कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई आणि आभार डॉ. रितू ठाकरे यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Harvesting: कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडणीला आली गती

Ethanol Industry: राज्यात जितका उपयोग तितकेच इथेनॉल खरेदी

Parth Pawar Land Controversy: चौकशी समितीच्या अहवालात सर्व तथ्ये समोर येतील : पवार

Cotton Production: खानदेशात एक लाख कापूसगाठींचे उत्पादन

Soybean Rate: मध्य प्रदेशात सोयाबीनला १३०० रुपये भाव फरक

SCROLL FOR NEXT