Karnataka bailpola Agrowon
ॲग्रो विशेष

Karnataka bailpola : जेवळी परिसरात कारहुन्नवी उत्साहात

Team Agrowon

Dharashiva News : जेवळी व परिसरात शनिवारी (ता. ३) कारहुन्नवी (कर्नाटक बैलपोळा) सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली.

सध्या तीव्र उन्हामुळे शिवारातील विहीर, कूपनलिकेचे पाणी झपाट्याने कमी होत आहे. उन्हाळी पिकांना पाण्याचा ताण बसत असून शेतकरी मॉन्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. लोहारा तालुका हा कर्नाटक सीमेलगत असून येथे वीरशैव समाज मोठ्या संख्येने आहे.

यामुळे या परिसरात अनेक कानडी सण साजरी केले जातात. त्यापैकी खरीप पेरणीत दरवर्षी या भागात ज्येष्ठ पौर्णिमा दिवशी कारहुन्नवी हा सण पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरा केला जातो. या सणाच्या माध्यमातून शेतकरी आपल्यासोबत काबाडकष्ट करणाऱ्या पशुधनाचे कृतज्ञता व्यक्त करतात.

या वर्षीही कारहुन्नवी निमित्त येथे शुक्रवारी (ता. २) बैलांची खांदेमळनी करुण प्रथेनुसार खिचडी व ज्वारीची कणसे खाऊ घालण्यात आली.

शनिवारी (ता.३) कारहुन्नवीच्या दिवशी पशुपालकांनी आपल्याकडील गायी, म्हशी, बैल आदी पशुधनाला धुऊन- स्वच्छ करुण त्यांच्या अंगावर रंगी बेरंगी गोंड्यांचे बशींग, कासरे, शिंगोटे, गळ्यात घागर माळे, शिंगाना रंग, अंगाला पीवडी, चमेली आदी लावून सजविण्यात आले.

या नंतर शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या घरा पुढे पशुधनांची पारंपरिक पद्धतीने सहकुटुंब विधिवत पूजा केली. यावेळी पशुधनाला पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. पशुधनाचा जयजयकार व चंगभलचा घोष करण्यात आला.

कारहुन्नवी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. येथील प्रथेप्रमाणे दुपारी पशुधनाची सहवाध्य मिरवणूक काढून शेतकऱ्याने आपापल्या पशुधनाला ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या मंदिरात दर्शनासाठी नेले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT