Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance App : क्रॉप इन्शुरन्स अॅपवर पीकविमा पूर्वसूचना नोंदविताना दक्षता घ्यावी

Crop Insurance Scheme : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल कॅलेमिटीज) व काढणी पश्‍चात नुकसान (पोस्ट हार्वेस्टिंग) या जोखीमबाबी अंतर्गत पीकविमा परतावा मिळावा.

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील पिकांचे नुकसान अतिवृष्टीमुळे झाले असल्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी पीकविमा दाव्यासाठी क्रॉप इन्शुरन्स (Crop Insurance) अॅपवर टाइप ऑफ इन्सिडन्स (Type of Incidence) मध्ये एक्सेस रेनफॉल व इंड्यूएशन (Excess Rainfall व Inudation) हेच कारण नमूद करून नुकसानीची माहिती देणे आवश्यक आहे.

क्रॉप इन्शुरन्स अॅपवर नुकसानग्रस्त क्षेत्राची पूर्वसूचना सूचना, तक्रार विमा कंपनीकडे नोंदविताना योग्य ती दक्षता घ्यावी, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल कॅलेमिटीज) व काढणी पश्‍चात नुकसान (पोस्ट हार्वेस्टिंग) या जोखीमबाबी अंतर्गत पीकविमा परतावा मिळावा.

यासाठी हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या मंडलातील पीकविमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत पीकनुकसानीची माहिती (पूर्वसूचना) विमा कंपनीकडे ऑनलाइन पद्धतीने सादर करावी.

हिंगोली जिल्ह्यामध्ये एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून राबविण्यात येत आहे. यंदाच्या खरिपात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ४ लाख ७२ हजार १५ पीकविमा प्रस्ताव दाखल केले आहेत.

पीकविमाधारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून क्रॉप इन्शुरन्स अॅप (Crop Insurance App) डाउनलोड करावे. त्यामध्ये पीकविमा संरक्षण घेतलेल्या सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी पिकांच्या नुकसानीची माहिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Local Calamity) अंतर्गत नोंदवावी, असे कदम म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT